लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शासनाच्या धोरणानुसार बालविकास कल्याण विभागामार्फत अंगणवाडीला पोषण आहार देण्यात येतो. कुपोषण मुक्ती आणि गरोदर मातांना सकस आहार देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात मात्र हा आहार गुरांच्या तोंडी जात असल्याचे उघड झाले आहे. घरी नेण्याकरिता लाभार्थ्यांना देण्यात आलेला हा आहार ते गुरांचे खाद्य होत असल्याचे दिसून आले आहे.१ ते ३ वर्ष वयोगटातील मुलांना महिन्याला ३ किलो आहार देण्याचा शासनाचा दंडक आहे. यात उपमा ११७० ग्रॅम, बाल आहार १०४० ग्रॅम आणि शिरा ७८० ग्रॅम इतका दिला जातो. गरोदर माता व स्तनदा यांना साडेतीन किलो पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत.अंगणवाडीतून मिळत असलेला पोषण आहार निकृष्ठ दर्जाचा असल्यामुळे लाभार्थी गुरांना चारत असल्याचे लाभार्थ्यांच्या पालकांकडून कळते. पोषण आहार घरी न देता अंगणवाडीतच शिजवून मुलांना द्यावा व पोषण आहार उत्कृष्ट दर्जाचा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. संबंधित विभाग सदर योजनेवरती अवाढव्य खर्च करीत असताना याचा उपयोग लहान मुलांना तसेच स्तनदा व गरोदर मातांना होत नसल्याचे निदर्शनास येते. यामुळे केलेला खर्च व्यर्थ ठरत असल्याचेच दिसत आहे.कुपोषण मुक्तीकरिता शासनाकडून विविध उपकम राबविण्यात येत आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येते आहे. पण ग्रामीण भागात होत असलेल्या प्रकारामुळे शासनाच्या योजनांना खिळ बसत आहे.
अंगणवाडीचा पोषण आहार बनतो गुरांचा चारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:07 PM
शासनाच्या धोरणानुसार बालविकास कल्याण विभागामार्फत अंगणवाडीला पोषण आहार देण्यात येतो. कुपोषण मुक्ती आणि गरोदर मातांना सकस आहार देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात मात्र हा आहार गुरांच्या तोंडी जात असल्याचे उघड झाले आहे.
ठळक मुद्देशासनाचा खर्च ठरत आहे व्यर्थ : अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करणे गरजेचे