लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे. सदर आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा ठपका ठेवत तो तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाकचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शालेय पोषण आहार देणाऱ्या महिलांना प्रतिदिवस ३५० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय गटप्रवर्तकांना ४५० रुपये प्रतिदिवस मानधन देण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता अद्यापही त्यांनी केली नाही. सदर आश्वासनाची पूर्तता तात्काळ करण्यात यावी, या मागणीसह विविध मागण्याही निवेदनातून करण्यात आला आहेत. शिवाय ज्या अंगणवाडी केंद्रात २५ पेक्षा कमी मुले नाहीत अशा अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिवसभर असलेल्या ढगाळी वातावरणाची तमा न बाळगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्धा जिल्हा आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्त्वात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा संघटक असलम पठान, विजया पावडे, मैना उईके, मंगला इंगोले, ज्ञानेश्वरी डंबारे, शोभा तिवारी यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:50 PM
राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे.
ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर ठिय्या : केंद्र बंद करण्याचा निर्णय मागे घ्या