आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : यावर्षी सदोष बियाण्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केला आहे. तोंडाजवळ आलेले पीक गेल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रसंगावधान दाखवित उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी यांनी आष्टीला येवून तात्काळ निवेदन स्वीकारले. लागलीच अंतोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले. सदर अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा यांना पाठविण्यात येणार आहे.लहानआर्वी, अंतोरा, किन्हाळा, चिंचोली, माणिकनगर, खंबीत, बेलोरा, देलवाडी, जोलवाडी, अंबिकापूर या मौजातील कपाशीच्या बोंडांना मोठ्या प्रमाणात अळ्या आल्या. त्यामुळे कापूस पिकण्याऐवजी बोंड गळून पडत आहे. तर शेकडो बोंड सडले आहे. हजारो रुपये उसनवारीने आणून उभे केलेले पीक क्षणार्धात सपाट झाल्याने शेतकरी सैरावैरा झाले आहे. याची तक्रार आठवडाभरापूर्वी केली होती. मात्र कृषी सहाय्यक साझावर आले नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे.आज शंकरलाल राठी, राजेश ठाकरे, देविदास पाथरे, डॉ. नरेंद्र देशमुख, दिनेश मानकर, शरद जवळेकर, नरेंद्र राऊत, युवराज राऊत, गजानन आंबेकर, प्रशांत पांडे, हनुमंत कुरवाडे, गोरखनाथ भिवाकरे, जगदीश राठी, घनश्याम राठी व गावातील शेतकरी यांनी कपाशीचे झाड व बोंड घेवून तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकºयांनी उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे यांना कपाशी झाड व बोंड भेट दिली. तसेच निवेदन दिले. याकडे दुर्लक्ष झाल्यास सर्व शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करतील असा इशारा दिला आहे.पवनूर परिसरात प्रादुर्भावआॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : पवनूर येथील गजानन कडू, अरूण कडू संतोष उमाळे, प्रदीप सोनुरकर, शरद कोंडलकर, प्रमोद डांगे, महादेव कडू व इतर शेतकºयांच्या शेतात बोंडअळीने हल्ला केला. या शेतकºयांनी कावेरी कंपनीचे मणी मेकर, युवा बायो सिड, माऊली श्रीराम बायोसिड, तुलसी सिडचे सैराट आदी कंपनीचे बियाणे शेतात पेरेले होते. या वाणावर हिरवी व गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून प्रत्येक बोंडात अळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बोंडातून कापसाची निर्मिती होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या सदंर्भात कृषी विभागाला तक्रार केली असता तालुका कृषी अधिकारी मुडे, मंडळ कृषी अधिकारी भाष्कर मेघे, कृ.स. वहाने व चमूने भेट देवून पाहणी केली असून वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी बि.टी. कापूस बियाणे उत्पादन करून विकणाºया कंपन्यावर ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
संतप्त शेतकऱ्यांची तालुका कृषी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:17 PM
यावर्षी सदोष बियाण्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केला आहे.
ठळक मुद्देकपाशीवर बोंडअळी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन