डॉक्टर व कर्मचारी गैरहजर : अपघातग्रस्त उपचारापासून वंचितलोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : अपघातग्रस्त युवकास उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी गैरहजर होते. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. रविवारी घडलेल्या या प्रकारामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली. पवनी शिवारात मोटार सायकल अपघात होऊन दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याची पत्नी व मुलगीही जखमी झाली. त्यांना उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. शिवाय कर्मचारीही उपस्थित नव्हते. अपघातग्रस्तांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी नेहमीच गैरहजर असतात व योगय उपचार मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. येथे दुसऱ्या डॉक्टरची गरज असताना एकच डॉक्टर कार्यभार पाहत आहे. मिटींग, उशिराने येण्याचे प्रकार नित्याचे असून रात्री कर्मचारीच राहत नाही. यामुळे ग्रामस्थ तथा पोलीसही त्रस्त आहे. रविवारी संताप अनावर झाल्याने कुलूप ठोकर डॉक्टर व सुविधा देण्याची मागणी केली.
संतप्त ग्रामस्थांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप
By admin | Published: June 05, 2017 1:09 AM