सेलू (वर्धा ) : तालुक्यातील मौजा केळझर व गणेशपूर येथील समृद्धी महामार्गाच्या बांधकामाकरिता अंदाजे १२ कोटी रुपयांच्या माती व मुरूम चोरी प्रकरणी आरोपी अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लि. चे मालक अनिल कुमार यांना अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मौजा केळझर येथील शेतामधील १२ कोटी १० लाख ११२४८ रुपयांची माती व मुरूम चोरी प्रकरणी संमतीशिवाय उत्खनन केल्यामुळे में. कोझी प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडचे नीलेशसिंग यांनी २२ आॅगस्ट रोजी आरोपींविरु द्ध पोलीस स्टेशन सेलू येथे भादंविच्या कलम ३७९, ४२७, ४४७, ४११, व १२० (ब) ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच मौजा गणेशपूर येथील शेतामध्ये देखील अवैधरीत्या उत्खनन करण्यात आले, मात्र नेमका किती रुपयांचा मुरु म व माती नेण्यात आली याची मोजणी महसूल विभागाकडून झालेली नाही. सदर चोरी प्रकरणात दोन आरोपींपैकी अनिल कुमार यांना सदर प्रकरणातील तपासी अधिकारी ठाणेदार सुनील गाडे यांनी अटक केली. अधिक चौकशी करण्यासाठी सेलू पोलिसांनी सदर आरोपीची १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी अनिल कुमार यास शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.>अखेर आरोपीस यावे लागले शरणआरोपी अनिल कुमार यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने शरण येण्याचे निर्देश दिले होते.
कोट्यवधीच्या मुरुम चोरीप्रकरणी अनिल कुमार पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 5:22 AM