शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

पीठगिरणी व्यावसायिकाने जोपासले असेही पशुप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:34 PM

सूर्य आग ओकत आहे. उन्हाची काहिली वाढत आहे. या उन्न्हात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होते तर गुरांना किती भटकावे लागत असेल, याचा अंदाज येते ही बाब लक्षात घेत न्यू कुर्ला परिसरातील प्रशांत सरदार हा पिठगिरणी व्यावसायिक मागील कित्येक वर्षांपासून नित्यनेमाने ...

ठळक मुद्देउर्वरित कणिक, पिठाची विक्री न करता गुरांना चारतात : गिरणीसमोरच गुरांसाठी ठेवले पाण्याचे टाके

श्यामकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : सूर्य आग ओकत आहे. उन्हाची काहिली वाढत आहे. या उन्न्हात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होते तर गुरांना किती भटकावे लागत असेल, याचा अंदाज येते ही बाब लक्षात घेत न्यू कुर्ला परिसरातील प्रशांत सरदार हा पिठगिरणी व्यावसायिक मागील कित्येक वर्षांपासून नित्यनेमाने गुरांना पाणी पाजून पशुपे्रम जोपासत आहे. सोबतच पिठगिरणीतील उर्वरित कणिक न विकता ते गुरांना खाऊ घालण्याचे पुण्यकर्म करीत आहे.गोसेवेचा ध्यास घेतलेल्या सरदार यांनी आपल्या पिठगिरणीतील वाया जाणारे पिठ जमा करून ते जनावरांना खाऊ घालण्याचे काम सुरू केले आहे. भुकेसोबत त्यांची तृष्णा कशी भागेल, हा विचारही त्यांनी केला. यासाठी त्यांनी समोरच एक सिमेंटचे टाके ठेवले. यात पाणी भरून असल्यावर जनावरे त्यांचा वापर पाणी पिण्यासाठी करताना दिसून येतात. या टाक्यात पाणी भरून ठेवण्याचे कार्य ते कित्येक वर्षांपासून करीत आहेत. भूक आणि तृष्णा भागल्याने जनावरेही तृप्त होतात. उन्हाळ्यात आपल्या घरी पाणी समस्या असताना प्रशांत सरदार यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे.ग्रा.पं. कडून कधी पाणी पुरवठा होतो तर कधी खंड पडतो. अशा स्थितीतही ते टाक्यात पाणी भरून ठेवण्याचे कार्य करतात. हा उपक्रम सर्वत्र राबविला गेला तर जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागणार नाही. पावसाळ्यात तहान भागविण्यासाठी नाले, ओंढे, नदी असतात; पण रखरखत्या उन्हात हे सर्व आटतात. किंबहुना विहिरींची पातळीही कमी होते. परिणामी, जनावरेही तहानेने व्याकुळ होत असल्याचे दिसते. अशात सरदार यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे. ही पाण्याची व्यवस्था समाजासाठीही प्रेरणादायी कार्य ठरणारी आहे. त्यांच्या या कार्याची दखल प्रशासनाने घेऊन प्रशासनानेही जनावरांच्या पाणी समस्येबाबत उपाययोजना करावी. जेणेकरून त्यांची तहान भागविण्यात अडचण निर्माण होणार नाही.व्यवसायासोबतच भूतदयाप्रशांत सरदार यांचे उदरनिर्वाहाचे साधन सदर पिठगिरणी व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाचा कित्येक वर्षांपासून उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांचे घर हे पुलगाव ते नाचणगाव मार्गावर असल्याने तेथे मोकाटही जनावरांची ये-जा असते. कधी -कधी तर सरदार यांच्या पिठगिरणीसमोर पाण्याचे टाके आणि कनकेचे गोळे दिसत असल्याने जनावरांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही भूतदया अनेक गुरांना जगवित असल्याचे दिसून येत आहे.