लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने परिसरातील दहा गावांमधील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेळी, बैल, गाय, म्हैस आदी पाळीव जनावरांवर विविध आजार येत असून गावातील दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पशु व शेळी पालकांच्या अडचणीत भर पडली आहे. याकडे पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत तेथील रिक्त पदांचा भरणा करावा अशी मागणी आहे.गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह त्यांचे सहकारी असे पद मंजूर आहेत. परंतु, डॉ. सोमकुवर यांची बदली झाल्यानंतर हा दवाखाना बहूतांश वेळा अधिकारीच राहत नसल्याने बंद असतो. तर परिचारक हे गत काही दिवसांपासून गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नियोजित वेळेत हजर राहत नाहीत. विचारणा केली असता ते वैद्यकीय रजेवर असल्याचे सांगण्यात आले. शिवाय गावात तशी चर्चाही आहे.डॉ. सोमकुवर यांची बदली झाल्यानंतर येथील दवाखान्याचा अतिरिक्त प्रभार काजळी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला. परंतु, ते नियमित कन्नमवारग्राम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा देत नसल्याने आणि ते नेहमीच गैरहजर राहत असल्यामुळे गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याची सुसज्य इमारत शोभेची वास्तू ठरत आहे.सदर परिसरातील अनेक शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतात. मात्र, वेळीच त्यांच्या जनावरांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कन्नमवारग्रामसह आजनडोह, नांदोरा, हेटी, भिवापूर, बांगडापूर, आंभोरा, सिंदीविहिरी, ढगा आदी गावातील पशुपालकांची समस्या लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी या भागातील शेतीला जोड व्यवसाय करणाºयांसह पशु पालकांची आहे.गवळाऊ गार्इंचे अस्तित्व धोक्यातगवळाऊ प्रजातीची गार्इंच्या जतनासाठी सध्या सर्वस्तरातून प्रयत्न केले जात आहे. आयुर्वेदातील ढवळी गाय, गुत्समद ऋषीच्या आश्रमातील गाय या गवळाऊ असल्याचे संदर्भ आहेत. इंग्रजांनी सर्वप्रथम या प्रजातीचा अभ्यास केला. ही गाय जर्शी आदी इतर गायींच्या तुलनेत दुध कमी देत असली तरी तिचे दुध गुणकारकच असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या परिसरात अनेक शेतकऱ्यांकडे सदर प्रजातीची गाय आहे. मात्र, कन्नमवारग्राम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशु वैद्यकीय अधिकारीच नसल्याने पशुपालकांना वेळीच योग्य मार्गदर्शन तसेच त्यांच्या जनावरांना योग्य आरोग्यसेवा मिळत नाही. त्यामुळे गवळाऊ गायीचे अस्थित्त्वच धोक्यात आल्याचे पशुपालक सांगतात.कारंजा तालुक्यात सहा सेंटर आहेत. त्यापैकी चार ठिकाणी अतिशय अल्प मनुष्यबळ आहे. पशुधन पर्यवेक्षकांची पदभर्ती गत पाच वर्षांपासून झाली नसल्याने अनेकांकडे काही इतर पशु वैद्यकीय दवाखान्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला रिक्त पदांच्या स्थितीबाबतचा अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठवितो. वरिष्ठांच्या निर्णयानंतर ही समस्या कायमची सुटेल.- डॉ. रजीव भोजने, उपायुक्त, पशुसंवर्धन वर्धा.
पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:32 PM
येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने परिसरातील दहा गावांमधील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेळी, बैल, गाय, म्हैस आदी पाळीव जनावरांवर विविध आजार येत असून गावातील दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पशु व शेळी पालकांच्या अडचणीत भर पडली आहे.
ठळक मुद्देवरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे : जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर