शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कृषी महोत्सवापाठोपाठ पशु प्रदर्शनाचा ‘फ्लॉप शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 5:00 AM

पशुसंवर्धन विभागामार्फत वायगाव (निपाणी) येथे देवळी मार्गालगतच्या सिंघानिया ले-आउटमध्ये आयोजित या पशुप्रदर्शनाकरिता जिल्हा नियोजनसमितीमधून ५ लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, आयोजकांनी प्रदर्शनाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात काही कारणास्तव प्रचंड निरुत्साह दाखविला.

ठळक मुद्देवायगाव (नि.) येथील आयोजन । अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पशुसंवर्धनातून रोजगारनिर्मिती, पर्यायाने शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे कल वाढावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता जिल्हा परिषद, पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वायगाव (निपाणी) येथे पशु प्रदर्शनाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. मात्र, अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन, शेतकरी, पशुपालकांचा अत्यल्प प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने हे पशुप्रदर्शन ‘फ्लॉप’ ठरले.पशुसंवर्धन विभागामार्फत वायगाव (निपाणी) येथे देवळी मार्गालगतच्या सिंघानिया ले-आउटमध्ये आयोजित या पशुप्रदर्शनाकरिता जिल्हा नियोजनसमितीमधून ५ लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, आयोजकांनी प्रदर्शनाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात काही कारणास्तव प्रचंड निरुत्साह दाखविला. त्यामुळे पशुंची नोंदणीही अत्यंत कमी झाली. ढिसाळ नियोजनाची कुणकुण लागली म्हणावी की काय खुद्द खासदार, आमदार एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद अध्यक्षांनीदेखील ‘भव्य’ असे नामाभिधान केलेल्या या पशुप्रदर्शनाकडे पाठ फिरविली. निधीची पुरेशी तरतूद असतानाही प्रदर्शनस्थळी सोयी-सुविधांचाही प्रचंड दुष्काळ होता. त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. अनेकांनी या ‘भव्य’ आयोजनाविषयी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. नियोजनाच्या अभावामुळे दुपारनंतरच प्रदर्शनस्थळी वैरणटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी पशुपालकांची मोठी धावपळ झाली. जनावरांना याचा फटका बसला.उत्कृष्ट जनावरे निवडीची प्रक्रिया जिल्ह्याबाहेरील तज्ज्ञ अधिकाºयांमार्फत होणे गरजेचे आहे. तसा नियमदेखील आहे. या प्रक्रियेकरिता केवळ एका अधिकाºयाने हजेरी दर्शविली.त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाºयांमार्फत निवड प्रक्रियेचे सोपस्कार पार पाडण्यात आले. प्रदर्शनाकरिता बोटावर मोजण्याइतकेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे आयोजक अधिकाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असमन्वयाचाही प्रत्यय आला. कार्यक्रमाच्या संचालनात पशुधन विकास अधिकारी डॉ. अश्विन मेश्राम यांनी सन्माननीय पाहुण्यांचा चक्क एकेरी शब्दात नामोल्लेख केला. यात समाजकल्याण सभापती, कृषी व पशुसंवर्धन सभापती यांचा समावेश होता.हा विषयही प्रदर्शनस्थळी चर्चेचा विषय ठरला. आयोजनात नियोजनाचा पदोपदी अभाव असल्याने हे पशुप्रदर्शन ‘फ्लॉप शो’ ठरले. शासनाने या आयोजनावर केलेला खर्चही व्यर्थ ठरल्याचेच अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.जनावरे वाहतुकीसाठी तोकडी तरतूदपशुपालकांनी आपली जनावरे प्रदर्शनात सहभागी करावी याकरिता वाहतूक खर्च दिला जातो. मात्र, प्रतिजनावरे केवळ ३०० रुपये इतकी तोकडी तरतूद करण्यात आली. परिणामी अनेकांना अनावश्यक भुर्दंड सोसावा लागला. यात अधिकाºयांनी मोठे ‘अर्थ’कारण केल्याचा आरोपही पशुपालक आणि शेतकऱ्यांनी केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावीपशु प्रदर्शनाच्या आयोजनाकरिता जिल्हा नियोजन समितीतून पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. एवढी भरीव तरतूद असतानाही अधिकाऱ्यांनी ‘पुअर शो’ केला. पशुपालक, शेतकºयांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या प्रदर्शनावर झालेल्या खर्चाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला द्यावे, अशी मागणीही होत आहे.पैसा गेला तरी कुठे?पशुप्रदर्शनाच्या आयोजनाकरिता जिल्हा नियोजन समितीतून ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. असे असतानाही प्रदर्शनस्थळी सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव होता. निधी खर्चच करण्यात आला नसल्याचा आरोप शेतकरी-पशुपालकांनी केला. खर्च करताना संबंधित अधिकाऱ्यांना हात आखडता का घेतला, असावा याविषयीही चर्चेला पेव फुटले होते. एकूणच अधिकाºयांच्या उदासीनतेचा पशुपालक शेतकºयांना फटका बसला. आयोजनाची चौकशी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक