लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : गावात मागील दीड महिन्यापासून वाघाचे हल्ले सुरू आहे. यात अनेक जनावरांचा जीव गेला. भीतीमुळे शेती मशागतीची कामे रखडलेली आहे. गावकरी दहशतीत आहेत. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत असताना वनविभागाकडून याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी अखेर गावात आलेल्या वनविभागाच्या वाहनाला गाय, बैल व वासरू बांधून संताप व्यक्त केला. अखेर रात्री ११ वाजता खरांगण्याचे ठाणेदार निशीकांत रामटेके यांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला.सुसूंद (हेटी) हे जंगलव्याप्त भागात वसलेले गाव. गावात गोपालन हा शेतीला मुख्य जोडधंदा आहे. न्यू बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी सध्या या गावालगत आपले बस्थान मांडले आहे. मागील दीड महिन्यापासून या गावातील जनावरांवर सतत वाघाचे हल्ले सुरू आहे. यात शेळ्या, गाई, बैल व गोºहे वाघाच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. काही मरणाला टेकले आहे. त्यामुळे सर्वत्र भीती, दहशतीची गडद छाया पसरली आहे.अखेर सोमवारी चंपा शिवारात वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बैलाला बघायला आलेल्या वनविभागाच्या वाहनाला पुढे बैल तर मागे गाय व वासरू बांधले. या जनावरांची रखवाली तुम्हीच करा, अन्यथा वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी गावकºयांनी केली. गावकरी व वनविभागाच्या अधिकाºयांत वाद वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार निशीकांत रामटेके व वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस. ताल्हण यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत घातली. यातून मार्ग निघून रात्री ११ वाजता वाहनाची सुटका झाली.कामे खोळंबलीउन्हाळी भाजीपाला पिके शेतात सडली; पण शेतकरी काढणी करू शकला नाही. ओलीत सुद्धा करणे कठीण झाले आहे. या वाघाच्या दहशतीमुळे शेती मशागतीची कामे प्रभावित झाली. ५० हजारांचा बैल वाघाने मारला तर नुकसान भरपाईच्या नावावर तोंडाला पाने पुसली जात आहे.
सुसूंदवासीयांनी बांधली वनविभागाच्या वाहनाला जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:43 PM
गावात मागील दीड महिन्यापासून वाघाचे हल्ले सुरू आहे. यात अनेक जनावरांचा जीव गेला. भीतीमुळे शेती मशागतीची कामे रखडलेली आहे.
ठळक मुद्देपोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला : दीड महिन्यापासून वाघाची दहशत