बजरंग दलाच्या सहकार्याने वाहतूक पोलिसांनी केली कारवाई समुद्रपूर : मालवाहूत जनावरे कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांच्या मदतीने पकडून बजरंग दलाने समुद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर कारवाई रविवारी जाम चौरस्ता येथे करण्यात आली. बरबडी वरून हिंगणघाटकडे एमएच ३२- क्यू ३७२४ क्रमांकाच्या मालवाहू वाहनात सहा बैल, दोन गोरे भरून कत्तालखान्याकडे जात असल्याची माहिती बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी याची माहिती वाहतूक पोलिसांना देत त्यांच्या मदतीने जाम येथे सदर वाहन पकडून समुद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. समुद्रपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजितसिंह चव्हान यांच्या मार्गदर्शनात जमादार अनिल राऊत, नरेंद्र मते यांनी ही कारवाई केली. यावेळी बजरंग दलाचे विकास झाडे, सनी निवटे, पंकज लाटकर, गोलू दाबणे, अमोल झाडे, उमेश चौधरी, अभिलाश गिरडकर, किसना जवादे, मारुती डहाके, रामभाऊ मडावी, उत्सव सिडाम, चेतन हिवरकर, संजय मडावी, उत्सव सिडाम, चेतन हिवरकर, संजय कोरडे, रोशन कलोडे, प्रफुल चौके, सचिन डहाके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे पकडली
By admin | Published: July 25, 2016 1:55 AM