आॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : भारतीय निर्माण संस्था नागपूर केंद्र व बिरला गु्रप तर्फे आंजी(मो.) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उत्कृष्ठ निर्माण कार्य केल्याबद्दल विदर्भ स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायतचे सरपंच जगदीश संचेरिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंजी मोठी येथे १ कोटी रुपयांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे निर्माण करण्यात आले. या प्रकल्पाच्या निर्माण कार्यात उत्कृष्ठ तांत्रिक मार्गदर्शनाबाबत नागपूर येथील इशकुमार जैन यांना तर कार्यान्वीत यंत्रणा म्हणून जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता काळपांडे, यांना भारतीय निर्माण संस्थेचे अध्यक्ष पी.एस. पाटणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.सरपंच जगदीश संचेरिया यांनी सन्मानाचे श्रेय ग्रामविकास अधिकारी अंगद सुरकार, उपसरपंच नितीन भावरकर, ग्रामपंचायत व पाणी पुरवठा समितीचे सदस्य व कंत्राटदाराला दिले आहे.
आंजी(मोठी) विदर्भात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:45 PM
भारतीय निर्माण संस्था नागपूर केंद्र व बिरला गु्रप तर्फे आंजी(मो.) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उत्कृष्ठ निर्माण कार्य केल्याबद्दल विदर्भ स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठळक मुद्देजलशुद्धीकरणाच्या कामाची प्रशंसा