शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

‘नॉन एफएक्यू’ दर्जाच्या सोयाबीनची आधारभूत किंमत जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:02 PM

यंदा काही भागात परतीचा पाऊस झाला. यामुळे सोयाबीन ओले झाले. यात ते काळे पडून त्याची प्रतवारी ‘नॉन एफएक्यू’ दर्जाची झाली. शासनाने नॉन एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची आधारभूत किंमत....

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणी : एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : यंदा काही भागात परतीचा पाऊस झाला. यामुळे सोयाबीन ओले झाले. यात ते काळे पडून त्याची प्रतवारी ‘नॉन एफएक्यू’ दर्जाची झाली. शासनाने नॉन एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची आधारभूत किंमत जाहीर करावी तथा शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. याबाबत एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना निवदेन देण्यात आले.नैसर्गिक संकटाने ‘नॉन एफएक्यू’ दर्जाचे सोयाबीन शासकीय आधारभूत किमतीने केंद्रावर खरेदी केले जात नाही. खुल्या बाजारात १२०० ते २३०० रुपयांनी व्यापारी हे खरेदी करीत आहे. शासनाचे बंधन नसल्याने शेतकºयांना गरजेपोटी माल विकावा लागतो. यात शेतकºयांची लूट होते. मागील हंगामात डिसेंबर २०१६ मध्ये बाजार आवारात विकलेल्या सोयाबीनला प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले. शेतकºयांकडून बँक खाते क्रमांक, विक्रीच्या पावत्यांसह अर्जाची मागणी केली; पण शेतकºयांना अनुदानाची रक्कम दिली नाही. ती रक्कम त्वरित वितरित करावी. कापूस, सोयाबीन, तूर, चना व अन्य शेतमालाची केवळ एफएक्यू दर्जाच्या मालाची आधारभूत किंमत शासन जाहीर करते. या दर्जाच्या शेतमालाला संरक्षण दिले जाते; पण नैसर्गिक संकटाने प्रतवारीवर प्रभाव पडलेल्या शेतमालाला संरक्षण मिळत नाही. शेतात उत्पादित शेतमाल ३-४ प्रतीचा असतो. खºया अर्थाने आधारभूत किंमतीचे संरक्षण देण्यास्तव शेतमालाचे ए, बी, सी या तीन प्रतवारीने आधारभूत किंमत जाहीर करण्याचे धोरण ठरवावे, कोणत्याही शेतकºयांचे कृषी पंपाची वीज जोडणी कापू नये, अशी मागणीही शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य मधुसूदन हरणे यांनी केली आहे. अन्यथा शेतकºयांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.