लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.डॉ. नवले म्हणाले की, राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुष्काळाचे सावट आहे. खरीपाची पीके हातीची गेली आहेत. रब्बी पीके हातुन जाण्याची शक्यता आहे.जनावरांच्या चाºयाचा प्रश्न अत्यंत जटील आहे. यावेळी चारा पशुखाद्य अत्यंत वेगाने महाग होत आहेत. जनावर व नागरीकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कठीण होणार आहे. राज्यात अशी परीस्थिती असतांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त काढला आहे.दुष्काळात निर्माण होणाºया प्रश्नांबाबत सरकारी उपाययोजनेची तयारी मात्र अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. दुष्काळाच्या या छायेत शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांना सावरण्यासाठी ३० जून २०१८ पर्यंत कर्जमाफी द्या. कर्जमाफीची दीड लाखाची कर्ज मर्यादा रद्द करा, कर्जाचे नियमित नुतनीकरण केलेल्या शेतकºयांनाही संपूर्ण कर्जमाफी द्या, दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या. पिक विमा योजनेची रास्त अंमलबजावणी करा, दुष्काळात होणाºया पाणी, चारा टंचाई दुर करण्यासाठी तातडीने नियोजन करा, रोजगार हमीची कामे सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा, जनतेला पुरेश्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पुरेशी सरकारी केंद्र सुरू करावी, उपलब्ध पाण्याचे समन्वयाने वाटप करावे, दारूच्या कारखान्याला पाणी देणे तातडीने थांबावे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी. आदी मागण्यांना घेऊन किसान सभा आगामी काळात आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी कोल्हापुर येथे दोन दिवस शेतकरी कार्यशाळा घेणार आहे. व मुंबई येथे शेतकरी मेळावा घेणार आहे. या माध्यमातून सरकार विरोधातील रोष व्यक्त होणार आहे व सरकारला जागे केले जाणार आहे अशी माहीती डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रसंगी किसान सभेचे राज्य सरचिटणीस व सुकाणू समिती प्रमुख डॉ. अजित नवले अहमदनगर, राज्य अध्यक्ष किसन गुजर नाशिक, नगरसेवक यशवंत झाडे. जानराव नागमोते, अनिल चव्हाण, अरूण लाटकर, राजू हटवार, शंकरराव दानव, महादेव गारपवार, दादा रायपुरे, अमोेल मारकवार, आदी उपस्थित होते.
राज्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा लॉग मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:24 PM
देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.
ठळक मुद्देकिसान सभेची मागणी :कोल्हापुरात ठरणार रणनिती मुंबईत घेणार शेतकरी मेळावा