लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक सत्रासाठी शाळांतील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवार २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यानंतर पालकांना २४ जानेवारी ते १२ फेबु्रवारी दरम्यान आरटीईच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.प्रवेशाची पहिली सोडत १४ व १५ फेब्रुवारीला निघणार आहे. गरीब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळण्यासाठी सर्व शाळांतील २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जात आहे. विलंब टाळण्यासाठी यंदा जानेवारीपासूनच ही प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश प्राप्त पाल्यांच्या पालकांनी १६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करावयाचे आहे. पहिल्या फेरीत ज्या पालकांना अर्ज करता आला नाही, त्यांना अर्ज करण्यासाठी १६ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत पुन्हा संधी आहे. प्रवेशाची दुसरी सोडत ७ व ८ मार्च या कालावधीत निघेल. त्या यादीतील पाल्यांचा ९ ते १२ मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहे. दोन्ही फेरीत अर्ज करायचे राहिलेल्यांना ९ ते २२ मार्च या काळात पुन्हा संधी मिळणार आहे. पालकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.अशी आहे प्रक्रियाआरटीई प्रवेशपात्र शाळांची नोंदणी १० ते २० जानेवारी, पालकांनी आॅनलाईन अर्ज भरणे २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, पहिली सोडत काढणे १४ व १५ फेब्रुवारी, पालकांनी प्रवेश निश्चित करणे १६ फेब्रुवारी ते १ मार्च, पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी १६ फेब्रुवारी ते ३ मार्च, दुसरी सोडत ७ व ८ मार्च, पालकांनी प्रवेश निश्चित करणे ९ ते २१ मार्च, पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी ९ ते २२ मार्च, तिसरी सोडत २६ व २७ मार्चला आहे.आवश्यक कागदपत्रेरहिवासी पुराव्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला), जन्मदाखला, बालकाचे पासपोर्ट साइज रंगीत छायाचित्र द्यावयाचे आहे.
‘आरटीई’साठी प्रवेशाचे आॅनलाईन वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 9:53 PM
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक सत्रासाठी शाळांतील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवार २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
ठळक मुद्देप्रक्रियेला प्रारंभ : २४ जानेवारीपासून स्वीकारणार अर्ज