लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिपरी येथील लग्नात मेहंदी लावण्यासाठी आलेल्या तरूणीच्या घरी शेतमोजणीसाठी गेलेल्या भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. हा कर्मचारी शासकीय दस्ताऐवज घेवून वर्धा येथील प्रशासकीय भवनात तसेच आर्वी येथील भूमीअभिलेख कार्यालय आणि वर्धा दौऱ्यादरम्यान बरबडी परिसरात आपल्या सासूरवाडीतही जाऊन आला. त्यामुळे आता आर्वीचे भूमिअभिलेख कार्यालय, वर्ध्यातील प्रशासकीय भवन व सासूरवाडीतील बरबडी गावाचा काही भाग सील करण्यात आला आहे. एका व्यक्तींनी तीन जागांवर प्रशासनाची डोकेदुखी वाढविली आहे. वर्धा शहरात प्रशासकीय भवनाचे कार्यालये तीन दिवस बंद राहणार आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढतीवर असून आज १४७ अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी तीन पॉझिटीव्ह आढळले आहे. यात १ जिल्ह्यातील व दोन वाशीम येथील आहे. १४४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. १०७ जन आयसोलेशन मध्ये आहेत. आज प्रशासनाच्या वतीने ९८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत ५६१५ नमूने तपासणीसाठी पाठविले आले. त्यापैकी ५५४१ नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. ५४७१ अहवाल निगेटीव्ह आले असून ७३ अहवाल अजूनही प्रलंबीत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची ४५ वर पोहचली आहे. १४ लोक कोरोनामुक्त झाले असून २९ अॅक्टीव्ह रूग्ण आहे. कोरोनामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर इतर आजाराने एक रूग्ण दगावला असेही प्रशासनाने सांगितले आहे. सद्या ६०६६० व्यक्तींचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. तर ५३४६६ व्यक्तींचा गृहविलगीकरणाचा कालावधी संपलेला आहे. सोमवारी ७१९४ लोक गृहविलगीकरणात आहेत. तर २०४ लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सद्या जिल्ह्यात आर्वी, वर्धा शहर व पिपरी, बरबडी, नालवाडी आदी ठिकाणी कन्टेन्मेंट झोन कार्यान्वित आहेत. प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहे.
एका रूग्णामुळे तीन ठिकाणी मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 5:00 AM
एका व्यक्तींनी तीन जागांवर प्रशासनाची डोकेदुखी वाढविली आहे. वर्धा शहरात प्रशासकीय भवनाचे कार्यालये तीन दिवस बंद राहणार आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढतीवर असून आज १४७ अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी तीन पॉझिटीव्ह आढळले आहे. यात १ जिल्ह्यातील व दोन वाशीम येथील आहे. १४४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
ठळक मुद्देआवी,वर्ध्यात कार्यालय तर बरबडीत सासूरवाडी सील