शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

भदाडी नदीच्या पुलावर पुन्हा अपघात, दोन जण गंभीर; दुभाजकावर धडकली कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 6:36 PM

भदाडी नदीच्या पुलावरील हा चौथा अपघात असल्याचे नागरिक बोलू लागले आहे. याठिकाणी अपघातप्रवण स्थळ म्हणून फलक लावावा, अशी मागणीही आता नागरिक करीत आहे.

वर्धा : चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने भरभाव कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन धडकल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात सेलसुरा नजीकच्या भदाडी नदीच्या पुलावर १६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वैभव बोधलकर, योगेश चावके दोन्ही रा. यवतमाळ अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

वैभव बोधलकर आणि योगेश चावके हे दोघे एम.एच. २९ बी.वाय. २९१८ क्रमांकाच्या कारने वर्ध्याकडे येत होते. दरम्यान चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित झाली आणि भदाडी नदीच्या पुलावरील रस्ता दुभाजकाला धडकली. जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पंचनामा केला. भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने कारच्या समोरील भागाचा चुराडा झाल्याने मोठे नुकसान झाले.

भदाडी नदीच्या पुलावरील हा चौथा अपघातसेलसुरा येथील भदाडी नदीच्या पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. याच ठिकाणी एका कारचा अपघात झाला होता. या अपघातात सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा जीव गेला होता. त्यानंतरही अनेक अपघात झाले. भदाडी नदीच्या पुलावरील हा चौथा अपघात असल्याचे नागरिक बोलू लागले आहे. याठिकाणी अपघातप्रवण स्थळ म्हणून फलक लावावा, अशी मागणीही आता नागरिक करीत आहे. 

टॅग्स :Accidentअपघातcarकार