शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

स्वच्छता अभियानात नेरी मिर्झापूर जिल्ह्यात दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 9:23 PM

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७ -१८ चे पुरस्कार स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आले. यामध्ये आर्वी पंचायत समिती अंतर्गत असलेले नेरी मिझार्पूर गावाला जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव : गावकऱ्यांच्या स्वच्छता लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७ -१८ चे पुरस्कार स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आले. यामध्ये आर्वी पंचायत समिती अंतर्गत असलेले नेरी मिझार्पूर गावाला जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते सरपंच पदमा मुन्द्रे, उपसरपंच बाळा सोनटक्के, ग्रामसेवक राजू शेंद्रे यांनी स्विकारला.आर्वी तालुक्यातील नेरी मिझार्पुर या गावाने नवनवीन प्रयोग तथा उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. गाव निरोगी राहण्यासाठी गावाची स्वच्छता करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून गावात २०१७ मध्ये जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत विविध स्वच्छता विषयी यशस्वी उपक्रम राबविणयात आले. रोगराई विरूद्ध यशस्वी लढा गावकºयांच्या सहकार्याने पूर्ण केला.१ ते १५ जून दरम्यान ग्रामसभा व ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समितीची बैठक घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. यात गावातील शौचालय निर्मिती तथा संपूर्ण गावातील स्वच्छतेचा आराखडा तयार करून आराखड्या प्रमाणे स्वच्छता विषयक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली.१ आॅक्टोबर रोजी महिला ग्रामसभा आयोजित करून कुटुंबाची, घराची तथा परिसराची स्वच्छता करण्याबाबत महिलांचा सहभाग वाढविला. यातूनच स्वच्छता विषयी जन जागृती, ग्राम सफाई, कचरा मुक्ती अभियान यशस्वी झाले. वैयक्तिक स्वच्छता जागृती मध्ये नखे काढणे, स्वच्छ आंघोळ करणे, केस धुणे, उवा निर्मुलन मोहीम तथा घर, परिसरातील स्वच्छता, सजावट मोहीम घेण्यात आली. त्याच प्रमाणे हात धुवा मोहीम प्रात्यक्षिक दाखवून गावकºयांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, पालकांना हात धुण्याचे महत्त्व समजविण्यात आले.श्रमदानातून गाव स्वच्छता सफाई मोहीम तसेच आदर्श गोठा करण्यात आले. पाणी शुद्धता, गटार व्यवस्थापन तसेच गावातील नागरीकांन साठी स्वच्छता स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली. गावातील संपुर्ण घरावर महीलांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या. यातूनच आदर्श माता, स्वच्छ घरे, स्वच्छ वर्ग शाळा, स्वच्छ गोठा, स्वच्छ गल्ली, स्वच्छ वस्ती, उत्कृष्ट पाणी साठवण याबाबतीत नेरी मिझार्पुर अग्र क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे ग्रामसचिव, सदस्य व गावकरी यांच्या सहकार्यातून मिझार्पूरमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे.

टॅग्स :Prakash Mehtaप्रकाश मेहता