लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेला आरोग्य विभाग डेंग्यू या किटकजन्य आजाराला वेळीच आळा घालण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत केळापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी योग्य कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. सकारात्मक चर्चेअंती संतप्त आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.केळापूर या गावात प्रत्येक घरी डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झालेले रुग्ण दिसून येतात. यापूर्वी डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाल्याने तेथे काही जणांना प्राण गमवावे लागले आहे. असे असताना ठिकठिकाणी अडणारे सांडपाणी आणि ठिकठिकाणी साचनारे पावसाचे पाणी यासंदर्भात तेथील ग्रा.पं. प्रशासन व जि.प.चा आरोग्य विभाग योग्य पाऊल उचलताना दिसत नाही. याच पाश्वभूमिवर डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाल्याने विजय मुंजेवार (२६) रा. केळापूर याला सुरूवातीला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर वार्ता गावात माहिती होताच संतप्त ग्रामस्थांनी वर्धा शहर गाठून जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी केळापूर गावात प्रत्येक घराच्या आवारात शोषखड्डे तयार करावे. नागरिकांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या ग्रामसेविका जीवतोडे यांची तात्काळ बदली करण्यात यावी. मुंजेवार कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात यावी. केळापूरातून डेंग्यू या आजाराला हद्दपार करण्यासाठी योग्य पाऊल उचलण्यात यावे, शिवाय गावातील शेणखताची ढिगारे वेळीच उचलण्यात यावे, आदी मागण्या याप्रसंगी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांच्याकडे केल्या. याप्रसंगी जि.प. सदस्य विजय आगलावे, राणा रणनवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न केल्यास ग्रा.पं.चे कामकाज ठप्प करू. शिवाय वेळप्रसंगी ग्रा.पं. कार्यालयालाच कुलूप लावू असा इशारा निवेनातून दिला आहे. आंदोलनात संजीवनी बोरकर, कुसुम मानकर, रंजना मानकर, रंजना कांबळे, ज्योत्स्रा थूल, संजय थूल, संगीता ढोणे, प्रकाश चावके, बेबी भोयर, चंदा भोयर, सुनीता भोयर, प्रतीभा हांडे, मिना मसराम, अनिल नैताम यांच्यासह केळापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ग्रामसेविकेची हकालपट्टी करण्याची रेटली मागणीकेळापूर येथील जीवतोडे नामक ग्रामसेविका यांना शासनाच्या कुठल्याही योजनेची माहिती विचारली असता त्या नागरिकांना माहिती देत नाहीत. इतकेच नव्हे तर त्या ग्रामस्थांना सौजन्याची वागणूक देत नाही असा आरोप करीत त्याची तात्काळ बदली करण्यात यावी. तसेच त्यांच्या जागेवर त्वरित कर्तव्यदक्ष अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणीही यावेळी संतप्त ग्रामस्थांनी लावून धरली होती. या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन योवळी जि.प. अध्यक्ष मडावी यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
डेंग्यूने केळापुरात घेतला आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:40 PM
कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेला आरोग्य विभाग डेंग्यू या किटकजन्य आजाराला वेळीच आळा घालण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत केळापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी योग्य कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. सकारात्मक चर्चेअंती संतप्त आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
ठळक मुद्देसंतप्त ग्रामस्थांचा जिल्हा परिषद अध्यक्षांना घेराव