लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी होवून आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने शासनाने शेतकºयांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज भरण्यात आले. यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले.ज्यांच्यावर कर्ज नाही अशाही शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. संबंधित अर्जाची शहानिशा न करता ते बँकेत आले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांची वरिष्ठांना माहिती पाठविताना मोठी दमछाक होत आहे. शेतकऱ्यांवर कर्ज असो किंवा नसो मात्र प्रत्येक अर्जाची माहिती संबंधित तक्त्यात भरावी लागत आहे. त्यामुळे काम वाढलेले आहे. आॅनलाईन अर्ज भरताना सेतू केंद्रातून भरण्यात आले होते. त्यावेळी या केंद्रातील कर्मचाºयांनी शेतकरी सांगेल ती माहिती भरली. त्याच्यावर कर्ज आहे किंवा नाही यांची शहानिशा केली नाही. त्यानुसारच याद्या तयार करण्यात आल्या व त्या तलाठ्याकडे जमा झाल्या. नंतर त्या बॅकेत पाठविण्यात आल्या बॅकेने त्या फलकावर लावल्या व अनेकांना कर्जमाफी दिली. काही अर्ज कर्ज नसलेले होते.पतीचे कर्ज पत्नीचाही भरला अर्जपीक कर्जाची पतीने उचल केली. त्यांचे कर्ज माफ झाले. परंतु त्यानंतर त्यांनी पत्नीच्या नावेही आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज भरून बँकेची डोकेदुखी वाढविली आहे.पात्र नसताना शेतकऱ्यांसोबत काही नागरिकांनी कर्जमाफीचे अर्ज भरले. नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर व थकीतांसाठी माफीचे निकष देण्यात आले आहे. असे असताना सुद्धा कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरले आहे.- दीपक पिंपळीकर, वरिष्ठ शाखा प्रबंधक, बँक आॅफ इंडिया नाचणगाव.
कर्ज नसतानाही भरले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 10:08 PM
शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी होवून आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने शासनाने शेतकºयांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज भरण्यात आले.
ठळक मुद्देबॅकेची डोकेदुखी वाढली : कुटुंबातील दोघां-तिघांचे नावे यादीत