लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्यावतीने उमरगाव येथे शेत शिवारात कपासी पिकामध्ये गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाहणी करण्यात आली पिकातील गुलाबी बोंडअळी तपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रियंका ढेरंगे, कृषी सहाय्यक एस. एम. महाकाळकर उपस्थित होते.ओमप्रकाश जायसवाल यांच्या शेतामध्ये कपाशी पिकांची पाहणी करण्यात आली. ओलित केलेल्या कपाशीमध्ये बोंडअळीचा व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. उपस्थित शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी प्रादुभार्वाचे प्रमुख कारणे विषद करण्यात आली. यामध्ये कपाशी पिकाला ओलित करणे व रासायनिक खताचा अतिरेक व मध्यंतरी शेतकऱ्यांनी लाइट ट्रॅप नीम अर्क व रासायनिक फवारणी करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. कही भागामध्ये कपाशी पिकाचे पाने लाल पडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असता झाडामधे नत्राची व मॅग्निशीयमची कमतरता निर्माण झाल्यामुळे पाने लाल पडत असल्याचे प्रियंका ढेरंगे यानी सांगितलेतुर पिकावर शेंग पोखरणाºया किडीचा १० ते २० अळ्या तसेच पिसारी पंतगाच्या ५ ते १० अळ्या प्रति १० झाडे आढळून आल्या. इमामेस्टिन बेन्झोएट ५ टक्के एस जी ७ ग्राम १५ लीटर पाण्यात किवा इंडोस्कार्ब १४.५ टक्के ५ मिली १५ लीटर पाण्यात किवा किनोल्फोस २५ ते ३० मिली १५ लीटर पाण्यात टाकून फवारावे तसेच तुरीच्या खोडावरील करप्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मंकोझब बुरशीनाशक ४० ग्रॅम १५ लीटर पाण्यात टाकून रोगाची लॉगआन दिसताच खोड व फांदयावर फवारणी करावी असे एस .एम. महाकालकर यांनी सांगितले. सरासरी ५ ते १० टक्के पात्या फुले आणि हिरव्या बोंडाचे नुकसान असे दिसल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे समजावे. गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकरी बंधुनी ओलित व रासायनिक खते देण्याचे टाळावे, लाइट ट्रॅप लावा वे ५ टक्के निम अर्क किंवा दर्शपर्णी किंवा क्लोरोफायरिफॉस २० टक्के तीव्रतेचे ३० मिली १५ लीटर पाण्यात टाकून फवारणी केल्यास बोंडअळी नियंत्रणात आणु शकतो घरी साठवणुक केलेल्या कापसामध्ये गुलाबी बोंडअळीचे पंतग असण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी साठ वन केलेल्या कपाशीच्या ढिगा जवळ फेरोमन ट्रॅप लावावे व जमा झालेले पतंग नष्ट करून घ्यावे असे आवाहन कार्यक्रमाला उपस्थित शेतकºयांना करण्यात आले.
साठवण केलेल्या कापसावर फेरोमन ट्रॅप लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:39 AM
तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्यावतीने उमरगाव येथे शेत शिवारात कपासी पिकामध्ये गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाहणी करण्यात आली पिकातील गुलाबी बोंडअळी तपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीची पाहणी : शेतकऱ्यांना फवारणीविषयी केले कृषी कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन