इव्हीएममध्ये गडबडीचा संशय : उमेदवारांचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना साकडेवर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पक्षपात विरहित आणि पारदर्शक करण्यासाठी मतदान यंत्रासोबत वि.वि.पॅड मशीन लावावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी सायंकाळी विविध पक्षाच्या उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले. निवेदनानुसार, ८ आॅक्टोबर २०१३ च्या सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार निष्पक्षपाती व पारदर्शक निवडणूक करण्याच्या हेतूने मतदान यंत्रासोबत विविपॅड मशीन लावण्याचे आदेश दिले होते. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी. येत्या १६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली जि.प. व पं.स. निवडणूक पारदर्शक व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. असे न केल्यास सर्व अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. शिष्टमंडळात शरद कांबळे, पुनम जुगनाके, सुभाष पाटील, किसन वाघमारे, दिनेश थुल, महेंद्र गेडाम, मनीषा देशमुख, भीमराव शंभरकर, संदीप शिंदे, उज्वला देशमुख, संगीता मोहर्ले, हरेंद्र खंडाईत, जयशिल पानकडे, विनोद मेश्राम, प्रिया पाटील, सुनीता चांदुरकर, प्रफुल्ल कुचेवार, राष्ट्रपाल थुल, अमोल गोटे, श्यामभाऊ कोकाटे, सुनिता चांदुरकर, अमरजीत फुसाटे, नरेश आतराम यांचा समावेश होता.(जिल्हा प्रतिनिधी)
मतदान यंत्रासोबत विविपॅड मशीन लावा
By admin | Published: February 03, 2017 1:54 AM