लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : सेलू शहराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे सध्याची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजपचे सेलू शहर अध्यक्ष शब्बीर अली सय्यद यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून केली. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. सेलू तालुक्यात जवळपास ९० च्या आसपास गावे आहे. अनेक नागरिक शिक्षण व अन्य कारणांमुळे सेलूत स्थायी झाले आहे. अनेक नवीन परिसर शहरात विकसित झाले आहे. सेलूची पाणीपुरवठा योजना ही बरीच जुनी असल्याने नागरिकांना पाणी पुरवठा करताना अनेक अडचणी येत आहे. यावर्षी शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दरवर्षी निर्माण होणार असल्याने सेलू नगरपंचायतने सुधारित पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी निवेदनातून शब्बीर अली सैय्यद यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून केली.पालकमंत्री बावनकुळे यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन यावेळी दिले.निवेदन देताना सेलू भाजप तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, भाजपचे जिल्हा महामंत्री सुनील गफाट, नीलेश गावंडे आदी उपस्थित होते.
सेलूच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 8:55 PM
सेलू शहराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे सध्याची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजपचे सेलू शहर अध्यक्ष शब्बीर अली सय्यद यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून केली.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन। सय्यद यांची मागणी