अमोल सोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यंदाच्या वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने सरकारने आष्टी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे. या तालुक्यात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहे. पहिला मुहूर्त म्हणून चारा डेपो मंजूर केला आहे. टंचाईग्रस्त भागातील ४५० शेतकऱ्यांना तात्काळ मोफत चारा देण्यात येणार आहे. तशा सूचना तालुका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर चारा डेपो अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ४५० लाभार्थी शेतकºयांना मका, बियाणे, खत देवून दहा गुंठे शेतात चाºयाची लागवड पूर्ण करून त्यांना लागेल तेवढा चारा देण्यात येणार आहे. तर उर्वरित चारा त्याच शेतकºयांजवळून शासन दराप्रमाणे विकत घेणार आहे. यासाठी तहसीलदार आशीष वानखडे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एच. कांबळे यांची नुकतीच नियोजन बैठक पार पडली. २९ आॅक्टोबर पासून दुष्काळग्रस्त गावातील शेतकºयांचे अर्ज भरून त्याची प्रक्रिया पूर्ण करणे सुरू आहे. त्यामुळे पशुपालकांना भेडसावत असलेल्या जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निकाली निघणार असल्याने त्यांना आधार मिळाला आहे.तालुका पशुवैद्यकीय कार्यालयांतर्गत आष्टी, साहूर, तारासांवगा, अंतोरा, तळेगाव, वडाळा, भासवाडा या सात पशुधन पर्यवेक्षकांची जबाबदारी ठरविण्यात आली आहे. शेतामधील खरीपाची पीक संपत आली. पाण्याअभावी ज्वारी, मका, बाजरी पीक हातचे गेले. त्यामुळे जनावरांच्या चाºयासचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोयाबीनची आराजी कमी राहिल्याने शिवाय अनेक शेतकºयांची मोठाल्या यंत्राचा वापर करून मळणी केल्याने सोयाबीनचे कुटार यंदा सहज मिळणे कठीण झाले.अत्यल्प चाºयाच्या भरवश्यावर जनावरांचे पालन पोषण करणे शक्य नसल्याचे पशुपालक सांगतात. याचाच विचार करून शासनाने तात्काळ चारा डेपो मंजूर केला आहे. आष्टी तालुक्यात पहिल्यांदाच राज्य शासनाच्यावतीने चारा डेपो मंजूर केल्यामुळे तालुक्यातील पशुपालक जनावरांची विक्री न करता त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन करतील, अशी आशा तालुका प्रशासनाला आहे. हा चारा डेपो फायद्याचा ठरणाराच आहे.५० टक्क्यांच्यावर नुकसानआष्टी तालुक्यात खरीपाची एकूण २६ हजार ९७८ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी सोयाबीन पीक १० हजार २२७ हेक्टर होते. सोयाबीनची आराजी सरासरी एकरी दोन ते तीन क्विंटल लागली. त्यामुळे तहसीलदार यांनी ५० टक्केच्यावर नुकसान झाले असल्याचा अहवाल शासनाला सादर केला. विशेष म्हणजे तालुका प्रशासनातील तहसीलदार आशीष वानखडे, नायब तहसीलदार अमोल कदम, रणजित देशमुख आदींनी प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. वस्तूस्थिती जाणून हा अहवाल पाठविण्यात आला होता. चारा डेपो लवकरच सुरू होणार असून त्याचा लाभ पशुपालकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.आष्टी तालुक्यात चारा डेपो सुरू करण्याचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. येत्या आठ दिवसात चारा डेपो सुरू होणार असून तालुक्यातील सर्व शेतकºयांसह पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा. चारा डेपो पशुपालक व शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल.- एस. एच. कांबळे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, आष्टी (शहीद).
आष्टीसाठी चारा डेपो मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 9:49 PM
यंदाच्या वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने सरकारने आष्टी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे. या तालुक्यात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहे.
ठळक मुद्देआठवडाभऱ्यात होणार श्रीगणेशा : टंचाईग्रस्त भागातील ४५० शेतकºयांना मोफत चारा