लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नेपाळ-भारत मैत्री वीरांगणा फाऊंडेशन काठमांडू रौतहट नेपाळ व भारतीय दूतावास काठमांडू यांच्या वतीने तीन दिवसीय अांतरराष्ट्रीय महाकुंभ कवि महोत्सव सातवा सोशल मिडिया मैत्री संमेलन, प्रतिभा प्रदर्शन व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात साहित्यिक जगातील अनेक साहित्यकारांनी सहभाग घेतला होता. भारतीय महावाणिज्यक डॉ. कोटरा, स्वामी, केबिनेट मंत्री डॉ. डिम्पल झा, अजय कुमार गुप्ता, सांसद रेखा झा यांच्या हस्ते डॉ. अर्चना पाठ्या यांना स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ, हुंडा मुक्त समाज बनाओ, आदी विषयावर कविता सादर केल्या.
अर्चना पाठ्या नेपाळ- भारत मैत्री पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 9:51 PM