शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

वाळूमाफियांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा आशीर्वाद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:09 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : न्यायालयाच्या आदेशावरून वाळू उत्खननाला सध्या थांबा मिळाला आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे ...

ठळक मुद्देकारवाई न करण्याच्या लेखी पत्रावरून खळबळ । वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : न्यायालयाच्या आदेशावरून वाळू उत्खननाला सध्या थांबा मिळाला आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा करून त्याची नियमबाह्य वाहतूक वाळूमाफियांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर वाळूमाफियांवर कारवाईच करू नका, असा लेखी आदेश उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याची चर्चा सध्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये होत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा वाळूमाफियांना आर्शीवाद काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.हिंगणघाट तालुक्यातून वर्धा, वणा, पोथरा व यशोदा नदी वाहते. याच नदींच्या विविध भागातील पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून वाळूची नियमबाह्य वाहतूक केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी एका दबंग व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीचा मालकीचा वाळू भरलेले जड वाहन पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्या दबंग व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीनेही आपला जोर लावून पोलिसांवर दबावतंत्राचा वापर केला. त्यानंतरच या बड्या पोलीस अधिकाऱ्याने एक लेखी आदेश काढून वाळूमाफियांविरुद्ध कुठलीही कारवाई करू नका, अशा सूचनाच दिल्याची खमंग चर्चा सध्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, अल्लीपूर आणि हिंगणघाट या तीन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांमध्ये होत आहे. याबाबत अधिकची माहिती जाणून घेतली असता आवक-जावक क्रमांक नमूद केलेले सदर लेखी पत्र सुमारे पाच महिन्यांपूर्वी हिंगणघाटच्या उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी काढले होते. शिवाय, ते हिंगणघाट तालुक्यातीलच एका पोलीस ठाण्याला बजावल्याचेही सांगण्यात येते. महसूल व पोलीस विभागातील काही अधिकारी तसेच वाळूमाफिया यांच्यातील साटेलोट्यामुळेच सध्या अवैध उत्खननाचा व्यवसाय फोफावत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.हिंगणघाटात २० च्या वर वाळूमाफियाहिंगणघाट तालुक्यातून यशोदा, पोथरा, वर्धा आणि वणा नदी वाहते. याच नद्यांच्या बोरगाव, पारडी, चिचघाट, जुनोना, पोहणा आदी भागातील पात्रातून मनमर्जीने वाळूमाफियांकडून सध्या उत्खनन करून चढ्या दराने नागरिकांना वाळूची विक्री केली जात आहे. अवैधपणे उत्खनन करून तब्बल २० च्यावर वाळूमाफियांचा मनमर्जी कारभार सध्या सुरू असताना महसूल व पोलीस विभागातील अधिकारी कारवाई करण्याकडे दुर्लक्षच करीत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर सुजाण नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.प्राथमिक चौकशीत उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी वाळू माफियांवर कारवाई करू नका असा कुठलाही लेखी आदेश काढलेला नसल्याचे निदर्शनास येते. परंतु, असा काही प्रकार झाला काय याची शहानिशा केली जाईल. शिवाय दोषी आढळणाºयांवर कारवाई केली जाईल.- निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :sandवाळू