राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आर्वी येथील गणपती वॉर्डातील एका शालेय विद्यार्थ्याने आपल्या वडिलांचा भ्रमणध्वनी त्यांच्या नकळत घेतला. त्यातील आरोग्य सेतू अॅप उघडला आणि त्यावरील प्रश्नांची सविस्तर सकारात्मक उत्तरे देऊन सबमिटही केली. त्यामुळे लागलीच तात्काळ केंद्रीय आरोग्य टास्क फोर्सने कार्यवाही करून कोरोनाची कोणतीही लागण नसलेल्या एका कुटुंबाला विनाकारण सात दिवसासाठी क्वारंटाईन केले..भारतात कोरोनाची लागण झाल्यावर भारत सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सेतू अॅप सुरू केला या अॅपमध्ये वैयक्तिक तपासणीसाठीची प्रश्नावली असून त्याची अचूक उत्तरे दिल्यास वापरकर्त्यांची आत्म मूल्यांकन चाचणी घेतली जाते. या अॅपच्या माध्यमातून वापरकर्ता व संशयित कोरनाबाधित पाचशे मीटर ते दहा किलोमीटरच्या परिसरात असले व दोघांचेही ब्ल्यू टूथ सुरू असेल तर प्रत्येकाला धोक्याची सूचना किंवा माहिती प्राप्त होत होती.मात्र वर्धा शहरातील खडकपुरा गणपती वॉर्डातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने वडिलांचा मोबाईल उघडला. त्यावरील आरोग्य सेतू अॅपवरील प्रश्नाची सर्व सकारात्मक उत्तरे दिली. ही बाब त्याच्या कुटुंबातील कुणालाच माहिती नव्हती. सर्व उत्तरे सकारात्मक येताच या चाचणीचा संदेश केंद्रीय आरोग्य कोरोना टास्क फोर्सकडे गेला. त्यांनी तो फोन नंबर व सर्व पत्त्यासहित जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाला कळविला. त्यांनी आर्वीच्या आरोग्य विभागाला त्वरित माहिती दिली आणि आरोग्य पथक त्याचे घरी पोहोचले. त्यांची विचारपूस करण्यात आली. आपल्या मुलाच्या चुकीमुळे असा प्रकार घडला, यात आम्हाला काहीही माहित नाही असे या जोडप्याने सांगितले. तरीही प्रशासनाने त्या दोघांनाही सात दिवसासाठी क्वारंटाईन केले .
आरोग्य सेतू अॅप वापरताय.. जरा मुलांपासून दूर ठेवा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 8:09 PM
वर्धा शहरातील खडकपुरा गणपती वॉर्डातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने वडिलांचा मोबाईल उघडला. त्यावरील आरोग्य सेतू अॅपवरील प्रश्नाची सर्व सकारात्मक उत्तरे दिली. सर्व उत्तरे सकारात्मक येताच या चाचणीचा संदेश केंद्रीय आरोग्य कोरोना टास्क फोर्सकडे गेला.
ठळक मुद्देमुलाच्या हाती लागला मोबाईल आणि घरच्यांना व्हावे लागले क्वारंटाईन