लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकºयांच्या सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये अन् कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात वर्धा बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. सदर मोर्चाच्या माध्यमातून शेतकºयांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत शासनाप्रती आपला आक्रोश व्यक्त केला.कृषी उत्पन्न बाजार समिती येथून विदर्भातील शेतकºयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्त्वात शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळी ११ वाजतापासून शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकत्र येणे सुरू झाले. सुरुवातीला कृउबा समितीच्या आवारात अल्प आंदोलनकर्ते दिसून येत असल्याने हे आंदोलन फोल ठरेल, अशीच चर्चा आंदोलनस्थळी होती; पण अवघ्या काही वेळेतच मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या समस्या शासनदरबारी रेटण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाल्याने चित्रच बदलून गेले. मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके यांच्यासह काही मान्यवरांनी तसेच शेतकºयांनी मनोगत व्यक्त केले.दुपारी १ वाजताच्या सुमारास वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून निघालेला मोर्चा ३ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चा वर्धा पंचायत समितीच्या मुख्य द्वारासमोर आला असता तो पोलिसांनी अडवून धरला. यावेळी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. मोर्चात मनोज चांदूरकर, सुधीर पांगुळ, प्रशांत देशमुख, अतुल पाळेकर, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार व कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा.शेतकºयांची होणारी लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावी.ओलितासाठी शेतीपंपाला दिवसाला किमान १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा.शेतमाल विक्रीची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी.नरभक्षक वाघिणीच्या आकस्मिक मृत्यूला जबादार ठरवून कारंजा तालुक्यातील शेतकºयावर दाखल केलेले गुन्हे वनविभागाने मागे घ्यावे.कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाºयांकडून शेतकºयांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव दिले जात असल्यास त्या व्यापाºयाविरुद्ध कठोर कार्यवाही करीत त्याचा परवाना रद्द करावा.विविध शेतोपयोगी साहित्यावर वस्तुसेवा कर लावण्यात आला असून शेतीपयोगी साहित्याला तात्काळ वस्तुसेवा करातून मुक्त करण्यात यावे.पोलिसांची उडाली तारांबळभूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्यावतीने आयोजित शेतकºयांचा मोर्चा वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दुपारी १ वाजताच्या सुमारास बाहेर पडला. सुरूवातीला या परिसरात एक पोलीस शिपाई व एक वाहतूक पोलीस उपस्थित होता. सदर मोर्चाने अवघ्या आठ मिनीटांत वर्धा कृउबा समिती ते बजाज चौक, हे अंतर पूर्ण केले. दरम्यान, पोलिसांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नियोजित ठिकाणाहून मोर्चा निघताच अवघ्या काही मिनीटांतच बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावरील वाहतूक खोळंबली होती. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तब्बल अर्धा तास कसरत करून वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
शेतकºयांचा आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 11:33 PM
शेतकºयांच्या सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये अन् कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात ....
ठळक मुद्देभूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे आंदोलन : सोयाबीन अन् कापसाला भावाची मागणी