लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरेगाव भीमा येथील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच महाराष्ट्र बंदच्या दिवशी आंदोलनात सहभागी काही नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी स्थानिक बजाज चौकातून मुकमोर्चा काढण्यात आला. आंबेडकरी समाज समितीच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या या मुकमोर्चात मोठ्या संख्येने आंबेडकरी बांधव सहभागी झाले होते.स्थानिक बजाज चौकातून काढण्यात आलेला मुकमोर्चा दुपारी १ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कोरेगाव भीमा येथील घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी आंदोलनात सहभागी काही आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी या मुकमोर्चाच्या माध्यमातून रेटून लावण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला असता पोलिसांनी तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारासमोर उडविला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनाही पाठविली आहे.
कोरेगाव भीमा येथील घटनेतील आरोपींना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:54 PM
कोरेगाव भीमा येथील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच महाराष्ट्र बंदच्या दिवशी आंदोलनात सहभागी काही नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी स्थानिक बजाज चौकातून मुकमोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देआंबेडकरी समाज समितीचा मुकमोर्चा : जिल्हाधिकाºयांना निवेदन