स्वर्णीम संस्कृतीची माहिती : ब्रह्मकुमारी केंद्राचा उपक्रमवर्धा : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवा केंद्र यांच्यावतीने कला आणि अध्यात्म विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. संस्कृती प्रभाग द्वारा स्वर्णिम संस्कृती करिता कला व अध्यात्माचे महत्त्व विशद करण्यात आले. कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी विजय आनंद दुबे, छिंदवाडा हे प्रमुख अतिथी होते. तसेच मंचावर पोलीस उपअधीक्षक रविंद्र किल्लेकर, इम्रान राही, कवी पारीख, कवी इब्राहिम बक्ष, अनिल नरेडी, गायक स्मीता पडोळे, सेवा केंद्राच्या संचालिका माधुरीदिदी यांची उपस्थिती होती. विजय दुबे यांनी त्यांच्या सुमधुर वाणीतुन कवीतेच्या रूपाने विचार मांडले. कला असो की संगीत ही दोन्ही ईश्वराला प्राप्त करण्याचे, भेटण्याचे साधन आहेत. ब्रह्माकुमारी विद्यालयाद्वारा समाजाला खरा मार्ग दाखवण्याचे कार्य होत आहे. येथील भगीनींनी त्यांचे संपूर्ण जीवन मानव उत्थानाकरिता समर्पीत केले आहे. कमळाला काढण्याकरिता चिखलात जावे लागते, याचप्रमाणे समाज सुधारण्याचे कार्य येथे होत आहे. यानंतर बोलताना माधुरीदिदी म्हणाल्या, भारत देश एकेकाळी देव भूमी होती. या देशाला पुन्हा सुवर्णकाळा प्राप्त करुन देण्याकरिता सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. संघटन शक्तीने कोणतेही कार्य सहज शक्य होते, असे सांगितले. यासह उपस्थित कवींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अपर्णादीदी यांनी तर आभार मेघादीदी यांनी मानले. कार्यक्रमाला स्वप्नील, श्रावण, श्यामसुंदर, ज्योतीदीदी, मधुदीदी, ममतादीदी, दर्शनादीदी, रेणूदीदी यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
कला व अध्यात्म कार्यशाळा
By admin | Published: September 29, 2016 1:00 AM