लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या आलोडी, साटोडा, नालवाडी, पिपरी (मेघे) यासह अन्य भागात नळावर सर्रास मोटारपंप लावले जात असल्याने अनेकांना थेंबभर पाणी मिळेनासे झाले आहे. पर्यायाने कृत्रिम पाणीटंचाई या भागात निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरणाने नागरिकांच्या बेकायदेशीर कृत्याला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.शहरालगतच्या अकरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठ्याकरिता पीव्हीसी जलवाहिनी टाकण्यात आल्याने अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागते. परिणामी, पाणीपुरवठा ठप्प होतो. दर्जाहीन जलवाहिनीमुळे काही भागात अतिदाबाने तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे एक हंडा भरण्यास चक्क दहा मिनिटे लागतात. त्यातच नागरिकांकडून नळावर मोटारपंप लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना हंडाभरदेखील पाणी मिळत नाही. मागील चार दिवसांपासून आलोडी परिसरातील पाणीपुरवठा ठप्प होता. रविवारी सकाळी नळ आल्यानंतर अनेकांनी लगेच मोटारपंप लावून वारेमाप पाणीउपसा सुरू केला. यात अयोध्यानगर परिसरातील अनेकांना पिण्याच्या पाण्याविनाच राहावे लागले. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संवेदनाहिन नागरिकांप्रति प्रचंड संताप व्यक्त केला. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने धडक तपासणी मोहीम राबवून नळावर बेकायदेशीररीत्या मोटारपंप लावून पाणी उपसा करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसह नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्याची मागणी आलोडीतील नागरिकांनी केली आहे.जलवाहिनी नव्याने टाकण्याची मागणीनळयोजनेद्वारा पाणीपुरवठ्याकरिता कंत्राटदाराने जीआयऐवजी पीव्हीसी जलवाहिनी अंथरली आहे. आलोडी, साटोडा भागातून बांधकाम साहित्याची रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. वाहनांच्या दाबामुळे जलवाहिनीला सातत्याने गळती लागले. मात्र, दुरुस्तीला बऱ्याचदा विलंब होत असल्याने पाणीपुरवठा ठप्् होतो. याकरिता पाणीपुरवठ्याकरिता नव्याने जलवाहिनी अंथरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नळ सोडण्याच्या वेळाच नाहीतआलोडी, साटोडा या भागात बºयाचदा सकाळी सहा वाजता, कधी आठ वाजता तर कधी १० आणि दुपारी १२ वाजता नळ सोडले जातात. त्यातही अल्प काळ पुरवठा सुरू असतो. नळाच्या ठरावीक वेळा नसल्यानेही अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. नळ सोडण्याच्या वेळा निश्चित कराव्या, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
भरपावसाळ्यात शहरालगतच्या भागात कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 5:00 AM
शहरालगतच्या अकरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठ्याकरिता पीव्हीसी जलवाहिनी टाकण्यात आल्याने अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागते. परिणामी, पाणीपुरवठा ठप्प होतो. दर्जाहीन जलवाहिनीमुळे काही भागात अतिदाबाने तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे एक हंडा भरण्यास चक्क दहा मिनिटे लागतात. त्यातच नागरिकांकडून नळावर मोटारपंप लावण्यात आले आहेत.
ठळक मुद्देनळावर लावले जातात मोटारपंप : सुशिक्षितांचे बेकायदेशीर कृत्य