लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिकात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्वी नगरपालिकेने काही वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना नळ पाणीपुरवठा हस्तांतरित केला मात्र दिवसेंदिवस या जीवन प्राधिकरणाचे ढिसाळ व नियोजन शून्यतेमुळे नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे शहरातील गुरुजी वॉर्ड, विठ्ठल वार्ड, पाण्याच्या टाकी वार्ड, हनुमान वार्ड, खर्डी वार्ड, नेताजी वार्ड , दत्त वार्ड राणी, लक्ष्मीबाई वार्ड, जनता नगर आदी अनेक वार्डात पाण्याची टंचाई सुरू आहे काही ठिकाणी जलवाहिनी फुटली असल्याने या उन्हाळ्याच्या दिवसात हजारो लिटर पाणी वाया चालले आहेत.याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश मोटवानी यांनी जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता गुरुमुखी यांना फोन करून माहिती दिली. व नागरिकांना पिण्याचे पाण्याबद्दल होणारे हाल सांगितले असता त्यांनाच गुरुमुखी यांनी उलट शब्दात बोलून माझी तक्रार करा तुमच्या ने जे होते ते करून टाका अशी अरेरावीची भाषा वापरली या कार्यालयात एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित राहत नाही कंत्राटदार यांना मागील चार महिन्यांपासून बिल मिळाले नसल्याने तेही फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम करीत नाही रोजंदारीचे तीन कर्मचारी तेथे राहतात महत्त्वाची बाब अशी की अनेक नागरिकांच्या नळ पुरवठा मिळण्याबाबतचा अर्ज या कार्यालयातून गायब झाले असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र प्राधीकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे.तीन महिन्यापासून रस्ते खोदून ठेवलेआयुष कॉलनीतील मागील तीन महिन्यापासून जलवाहिनी टाकण्यासाठी नाल्या रस्ते खोदून ठेवली आहे परंतु एकही काम पूर्णत्वास गेले नाही शहरातील अनेक वार्डात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पाणी ही आवश्यक सेवा व अविभाज्य घटक असून अनेक वार्डात पाणी मिळत नाही. धड जलवाहिनी टाकण्याचे काम होत नाही येथील जीवन प्राधिकरणचे अभियंता वर्धेला असतात या कार्यालयात कोणीही तक्रार ऐकून घ्यायला तयार नाही. आम्ही समस्या कोणाकडे मांडायच्या? अभियंत्याला फोन केला असता ते अरेरावीची उत्तर देतात. वर्धा येथे राहूनच ते सर्व सूत्र हलवतात जर होत नसेल तर नोकरी कशाला करायची? नागरिकांना वेठीस धरण्यास की स्वत:चे हित साधण्यास? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.-सुरेश मोटवानी, सामाजिक कार्यकर्ते आर्वी.
आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 9:52 PM
जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिकात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देतीन दिवसाआड पाणीपुरवठा : अभियंत्याची अरेरावी