लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी शहरातील डॉ. निरज व संदीप कदम यांच्या एन.एस. अपार्टमेंटचे बांधकाम नियमबाह्य असल्याचे म्हणत इमारतीचा वापर त्वरित बंद करण्याचे आदेश आर्वी पालिकेने दिले होते. यावर स्थगिती मिळविण्यासाठी कदम यांनी न्यायालयात धाव घेतली असून शुक्रवारी निर्णय होणार आहे.एन.एस. अपार्टमेंटच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असताना तळ मजला नियमबाह्य पद्धतीने बॅँकेला भाडे तत्वावर देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी इमारत बांधकाम साहित्य अंगावर पडून आयसीआयसीआय बॅँकेच्या ग्राहकाला इजा झाली होती. याबाबत निलेश देशमुख यांनी आर्वी न.प. कडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने नगर परिषदेने इमारतीची पाहणी केली असता बांधकामच बेकायदेशीर असल्याचे आढळले. १ नोव्हेंबर रोजी आर्वी नगर परिषदने एन.एस. अपार्टमेंटचे मालक डॉ. निरज कदम यांना तीन दिवसांच्या आत इमारतीचा वापर बंद करण्याचे आदेश दिले होते.आर्वी नगर परिषदेच्या या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून डॉ. कदम आणि आयसीआयसीआय बॅँक यांनी १४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी न्यायालयाकडून दोन्ही डॉ. कदम व नगर परिषदेला नोटीस जारी केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. काय निर्णय होणार, याकडे आर्वीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.बांधकाम सुरू असतानाच डॉ. कदम यांनी तळमजला आयसीआयसीआय बँकेला भाडेतत्वावर दिला. याबाबतच्या तक्रारीवरून पाहणी केली असता बांधकाम नियमबाह्य असल्याचे दिसून आले. यामुळे इमारतीचा वापर बंद करण्याचे आदेश दिले होते. याविरूद्ध त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून नोटीस आला. शुक्रवारी निर्णय होणार आहे.- गणेश शिंदे, मुख्याधिकारी, न.प. आर्वी.
आर्वी पालिकेच्या कारवाईविरूद्ध न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:25 AM
आर्वी शहरातील डॉ. निरज व संदीप कदम यांच्या एन.एस. अपार्टमेंटचे बांधकाम नियमबाह्य असल्याचे म्हणत इमारतीचा वापर त्वरित बंद करण्याचे आदेश आर्वी पालिकेने दिले होते.
ठळक मुद्देनिलेश देशमुख यांची होती तक्रार : शुक्रवारी होणार ‘स्टे’वर निर्णय