लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनात पुन्हा खळबळ उडाली. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या असून, येथील सिंधी कॅम्प हा भाग सील केला आहे.कोरोनाबाधित महिला ही अकोल्यावरून आर्वीला २४ मे रोजी आली होती. ती सिंधी कॅम्प येथे वास्तव्याला असल्याने तो परिसर सील करण्यात आला आहे.ही महिला एक महिन्याचे छोटे बाळ व एक पुरुष असे तिघेजण अकोल्यावरून येथे आले होते. या तिघांची प्रशासनाने आधीच दखल घेऊन त्यांना क्वारंटाईन केले होते व नमुने तपासणीसाठी पाठवले होते.दरम्यान या महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले होते. तिची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.हे तिघेजण अन्य कुणाच्या संपर्कात आले होते का याची चौकशी केली जात आहे.
Corona Virus in Wardha; वर्धा जिल्ह्यातील आर्वीत सिंधी कॅम्प केला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 8:35 PM
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनात पुन्हा खळबळ उडाली. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या असून, येथील सिंधी कॅम्प हा भाग सील केला आहे.
ठळक मुद्देमहिला आढळली कोरोना पॉझिटिव्हकुटुंबातील व्यक्तींना केले क्वारंटाईन