आर्वी : वेदनेचा हुंकार अन स्वराचा झंकार! हा डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आर्केष्ट्रा स्वरानंदनवन रसिकमनाला स्पर्श करून गेला. आपल्या अपंगत्वावर मात करून जगण्याची उमेद व जिद्ध कायम असलेल्या या बहुविकलांग कलाकारांनी सादर केलेल्या गीत-संगीत व नृत्याविष्काराद्वारे आपल्यातील बहुमुखी प्रतिभेचा परिचय देत उपस्थित रसिक श्रोत्यांच्या थेट काळजालाच हात घालुन उपस्थित आर्वीकरांची वाहवा मिळवली.वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या आर्वी शहराच्या इतिहासात प्रथमच दोन हजार चौरस फुटाच्या भव्य रंगमचावरून महामानव बाबा आमटे यांनी उभारलेल्या आनंदवनातील अंध-अपंग-बहुविकलांग कलाकरांनी भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आर्वीकरासमोर प्रस्तुत केलेल्या आर्केष्ट्रा ‘स्वरानंदनवन’ अर्थात संगीत रजनीला रसिक श्रोत्यांनी डत्स्फूर्त दाद देवून मानवता व रसिकतेचा परिचय करून दिला.आर्वी लायन्स कल्बने आनंदवनातील कुष्ठरोगी, अंध-अपंग, अनाथ, आदिवासी बहुविकलांगांच्या साह्यार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. अमर काळे, नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित, पूर्तीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर दिवे, वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष अनिल जोशी, लायन्सचे प्रांतपाल राजे मुधोजी भोसले (नागपूर), उपप्रांतपाल सुनील व्होरा, कॅबीनेट सेक्रेटरी विवेक वैद्य, न.प. बांधकाम सभापती संजय थोरात, विजय बाजपेयी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक लायन्सचे संस्थापक अध्यक्ष तथा झोन चेअरपर्सन डॉ. रिपल राणे आणि प्रा. मोरेश्वर देशमुख यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश व रंगमंच पूजन झाले. याप्रसंगी स्वत:च्या अपंगत्वावर मात करून ‘स्वरानंदनवन’ यशो शिखरावर नेणारे व्यवस्थापक सदाशिव ताजने यांचा शाल श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्वी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. कालिंदी राणे, उपाध्यक्ष डॉ. दीपक चव्हाण, सचिव डॉ. प्रकाश राठी, कोषाध्यक्ष दीपक कटियारी, वैभव फटींग, महेश लाडके, लक्ष्मीकांत साखरे, ढबाले, शुभम देशमुख, लखन अग्रवाल, आशिष अग्रवाल, दीपक राठी, अॅड. जाणे, नितीन वानखेडे, संदीप राऊत, मनीषा ढोके, मंजुषा देशमुख, ढबाले, सुनीता अग्रवाल, सुनीता राठी, सुनिता कटियारी, ज्योती लाडके, आरती देशमुख, रेखा राऊत, वर्षा वानखडे यांनी सहकार्य केले. आर्वीकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)
आर्वीकरांनी अनुभवला ‘वेदनेचा हुंकार’
By admin | Published: May 08, 2016 2:36 AM