आॅनलाईन लोकमतवर्धा : जवाहर नवोदय विद्यालय, सेलू(काटे) येथील वर्ग १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आशिष बाबाराव सोनटक्के याने केंद्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत देशात प्रथम स्थान मिळविले आहे. त्याने तानतणाव कमी करण्यावर अत्यंत बोलके चित्र या स्पर्धेते रेखाटले.मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ‘परीक्षापर चर्चा नरेंद्र मोदी के साथ’ या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त परीक्षेतील तणाव कमी करण्यावर पोस्टर मेकींग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत केंद्र शासनाच्या अधिनस्थ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. नवोदय विद्यालयाच्या आशिष सोनटक्के याने सहभाग घेत प्रथम स्थान पटकाविले. विद्यालयाचे कला शिक्षक एस.आर. चांदोरकर यांनी मार्गदर्शन केले. खा. रामदास तडस यांच्या हस्ते आशिषला सन्मानित केले. यावेळी प्राचार्य आर. नागभूषनम, उपप्राचार्य अश्विनी कोन्हेर, निळकंठ मेहर, सर्व शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी संघाचे पंकज डोईफोडे, नितीन डोंगरे, डॉ. मिलिंद वासेकर, डॉ. अपूर्वा भगत डॉ. प्रशांत सावरकर स्उपस्थित होते.
आशिषचे पोस्टर ठरले देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:28 AM