शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

विधानसभा निवडणूक; हिंगणघाट कुणाचे; सेनेचे की भाजपचे, संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 1:49 PM

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार समीर कुणावार यांची मजबूत पकड असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकुणावारांनी केले सुरू काम राष्ट्रवादीत उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार समीर कुणावार यांची मजबूत पकड असल्याचे दिसून येत आहे. २०१४ मध्ये त्यांनी ६५ हजारांवर अधिक मताधिक्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतही भाजपला ३८ हजारांवर अधिक मताधिक्य मिळवून दिले. गेल्या साडेचार वर्षात या भागात कुणावारांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबूत झाले. त्यामुळे या मतदार संघावर भाजपने आपला प्रबळ दावा ठेवला आहे. पुन्हा कुणावारांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दूसरीकडे गेल्या २५ वर्षांपासून सेना-भाजप युतीमध्ये हिंगणघाट मतदार संघ शिवसेनेकडे राहात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने या मतदार संघावर आपला मजबूत दावा केला आहे. मातोश्रीवर अलीकडेच झालेल्या बैठकीत माजी आमदार अशोक शिंदे यांना कामाला लागा, असे सांगण्यात आले, अशी चर्चा शिवसेनेच्या वर्तूळात आहे. जिल्ह्यातील हा एकमेव मतदार संघ शिवसेना सोडणार नाही, असा दावाही शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहे. काही जरी असले तरी विद्यमान आमदाराची प्रबळ कामगिरी पाहू जाता भारतीय जनता पक्ष हिंगणघाट शिवसेनेला देईल, अशी शक्यता कमी आहे. दुसरीकडे कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोट्यात आहे. राष्ट्रवादीकडे माजी आमदार प्रा. राजु तिमांडे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिवाकरराव गमे हे प्रबळ दावेदार आहेत. या उमेदवारांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या मतदार संघात कुणबी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्याखालोखाल तेली समाजाचे मतदार आहे. २०१४ मध्ये मोदी लाट व व्यक्तीगत समीर कुणावार यांचा जनसंपर्क यामुळे या भागातील सामाजिक व जातीय समिकरण निवडणूकीत हद्दपार झाले. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षही कुणाला उमेदवारी देते हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसने मनसेसोबत आघाडी केल्यास हा मतदार संघ मनसेला सोडला जाईल, अशी चर्चा आहे. मनसेकडून येथे अतुल वांदिले हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपला उमेदवार दिला तरीही मनसे ही जागा लढवेल, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय वंचित बहूजन आघाडी, बहूजन समाज पार्टी, विदर्भ राज्य आंदोलन समिती आदी येथे आपले उमेदवार मैदानात उतरविणार आहे. विदर्भवादी नेते अनिल जवादे यांनी निवडणुक प्रचाराला सुरुवात केली आहे. या भागात शेतकरी संघटनेचेही मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. शेतकरी संघटना नेमकी काय भूमिका उमेदवारीबाबत घेते, हेही महत्वाचे राहणार आहे. मात्र समीर कुणावार यांनी गेल्या निवडणूकीत मिळविलेले मताधिक्य व लोकसभेत भाजपला मिळालेली आघाडी या भाजपसाठी जमेच्या बाजू आहेत.कॉँग्रेसची स्थिती अतिशय कमकुवतवर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट मतदार संघात कॉँग्रेस पक्षाची स्थिती अतिशय कमकुवत आहे. हिंगणघाट तालुक्यातील देवळी मतदार संघाच्या भागात कॉँग्रेसचे दखलपात्र नेते असले तरी हिंगणघाट विधानसभा मतदार संघात मात्र कॉँग्रेस पक्षाचे संघटन अतिशय खिळखिळे झालेले आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत सुधीर कोठारी व प्रा. राजू तिमांडे यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. विधानसभेतही कॉँग्रेसकडे फार प्रबळ दावेदार नाहीत.

व्यक्तीगत जनसंपर्कात कुणावार भारीहिंगणघाट, समुद्रपूर व सेलू तालुक्याच्या दोन महसूल मंडळ समाविष्ठ असलेल्या हिंगणघाट विधानसभा मतदार संघात कुणावारांनी गेल्या साडेचार वर्षात केलेले विकास कामे हे आजवरच्या हिंगणघाटच्या इतिहासातील ऐतिहासीक कामे आहे. व्यक्तीगत जनसंपर्क प्रचंड दांडगा असल्याने कुणावारांना या मतदार संघात लढत देण्यासाठी विरोधकांनाही तोडीचा उमेदवार शोधावा लागणार आहे. यातच विरोधकांचा कस लागणार हे निश्चित.

टॅग्स :Sameer Kunawarसमीर कुणावार