शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

अट्टल घरफोड्या जाळ्यात

By admin | Published: February 19, 2017 1:44 AM

घरफोडीच्या गुन्ह्यात साडेचार वर्षे कारावास भोगून परत आलेला आरोपी पुन्हा घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती आला आहे.

सात चोऱ्यांची कबुली : यापूर्वी चार वर्षे कारावास हिंगणघाट : घरफोडीच्या गुन्ह्यात साडेचार वर्षे कारावास भोगून परत आलेला आरोपी पुन्हा घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती आला आहे. त्याने शहरात सात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई येथील गुन्हे पथकाच्या पोलिसांनी केली. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी येथील पोलीस पथक रात्र गस्तीवर असताना येथील बीसीसी मैदानावर एक इसम पळण्याच्या तयारीत असल्याचे आढळले. पाठलाग करून त्याला सिंदी कॉलनीत गाठले. त्याने विक्की उर्फ दिलीप उर्फ सनी उमेश सराट असे नाव सांगितले. संशयावरुन त्याची कसून विचारपूस केली असता शहरातील सात घरफोड्यांची कबुली दिली. काही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने सुनील चव्हाण, मोहीत बाबुलाल बिनवने, राजेश सर्जेराव भोयर, सुनील मोहमल खियानी, प्रशांत ताराचंद बाराहाते, अब्दुल जुबेर अब्दुल कादर यांच्या घरातील चोरीची कबुली दिली. पाच वर्षांपूर्वी केल्या होत्या १५ घरफोड्या वर्धा : अट्टल घरफोड्या करणाऱ्या या आरोपीला पाच वर्षांपूर्वी त्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. यावेळी त्याने १५ घरफोडीचे गुन्हे कबुल केले होते. यावेळी त्याला चार वर्ष शिक्षाही झाली होती. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आणखी किती चोऱ्या उघड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर कारवाई ठाणेदार एस.डी. साळवे यांच्या मार्गदर्शनात दिलीप आंबटकर, गजेंद्र धर्मे, समीर कामडी, सतीश नंदागवळी यांच्या मार्गदर्शनात केली.