लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : खरांगणा येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास हात साफ केला. एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याबाबत बँकेकडे माहिती नाही. २२ डिसेंबरला या एटीएममध्ये ५२ हजार रुपये होते, असे सांगण्यात आले.वर्धा-आर्वी मार्गावर खरांगणा येथील शुक्ला कॉम्प्लेक्समध्ये सदर एटीएम आहे. हा भाग रात्रीला निर्मणुष्य असतो. येथे मानवी वस्ती नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. एटीएमच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्यांनी चोरी केली. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटे आत शिरले व एटीएमची तोडफोड करून यातील रक्कम लंपास केली. सदर प्रकार सकाळी येथील व्यावसायिक आपआपली दुकाने उघडण्यासाठी आले तेव्हा लक्षात आले. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून जमादार ओमप्रकाश इंगोले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठाणेदार निशिकांत रामटेके यांनी घटनास्थळाची पाहणी केली व बँक अधिकाºयांशी चर्चा केली. पण चोरी झाली तेव्हा एटीएममध्ये किती रोकड होती, याबाबत बँकेचे अधिकारी काहीही सांगू शकले नाही.
एटीएम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:40 AM
खरांगणा येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास हात साफ केला. एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याबाबत बँकेकडे माहिती नाही. २२ डिसेंबरला या एटीएममध्ये ५२ हजार रुपये होते, असे सांगण्यात आले.
ठळक मुद्देखरांगणा येथील घटना : सुरक्षा वाऱ्यावर