लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सध्या कपाशीचे बोंडे परिपक्व होऊन कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे. असे असताना मात्र आर्वी तालुक्यातील विरुळ रोहणाच्या काही भागात कपाशीवर लाल्या व मर रोगाने आक्रमण केले आहे. कपाशीची हिरवीगार पाने लाल पडून वाळत आहेत. तर रोहणा परिसरात काही भागात मर रोग आल्याने झाडे वाळत आहेत. त्यामुळे याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.यंदाच्या हंगामात आर्वी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. कोरडवाहू शेतकºयांच्या शेतातील कापसाचे एक दोन वेचे निघाले. मात्र यावर्षी लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने हिरवी पाने लालसर होऊन गळून पडत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावला आहे. रात्रीचा गारवा व दिवसाचे तापमान यामुळे हा रोग पडत असल्याचे सांगितले जाते.कसा टाळावा प्रादुर्भावकापसाला संरक्षित पाणी द्यावे. पाण्याचा निचरा चांगल्याप्रकारे करावा. खताची मात्रा योग्य वेळी व योग्य प्रमाणात द्यावी. पीक तणरहित ठेवावे.काही भागात लाल्या रोगाचे आक्रमण झाले असून रोहणाच्या काही भागात कपाशीवर मर रोग आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत मी एक दोन दिवसात या भागाचा दौरा करुन पाहणी करुन याबाबत शेतकºयांना कृषी विभागाकडुन योग्य ते मार्गदर्शन करणार आहे.पि.डी. गुल्हाणेतालुका कृषी अधिकारी आर्वी
वर्धा जिल्ह्यात कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:28 PM
सध्या कपाशीचे बोंडे परिपक्व होऊन कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे. असे असताना मात्र आर्वी तालुक्यातील विरुळ रोहणाच्या काही भागात कपाशीवर लाल्या व मर रोगाने आक्रमण केले आहे.
ठळक मुद्देनवे संकटप्रतिकूल हवामानअन्नद्रव्यांची कमतरता