लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : यंदाच्या वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करताना ४ ते ६ तासावर सोयाबीन पिकासोबत तुरीची लागवड केली. परंतु, सध्या याच पिकावर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे तूर उत्पादकांच्या अडचणीत भर पडली असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.सदर अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरूवातीला फिनाफॉस, प्रॉक्लेम, गायत्री फरफेक्ट, टाकुमी फेन, केम, कोराजन, मिसाईल सारखे औषधींची तुरीवर फवारण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. परंतु, सात दिवसात परिस्थिती जैसे थे होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तुरीच्या शेंगांमध्ये सदर अशी दडून राहत असल्याने औषधांचा पाहिजे तसा परिणाम होत नसल्याचे शेतकरी सांगतात.शिवाय फवारणीच्या औषधीचे प्रमाण जास्त झाल्यास बहार गळण्याची तसेच उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी या भागातील तूर उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.थंडीचे प्रमाण कमी व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याचे विपरित परिणाम तूर पिकावर दिसून येत आहे. शिवाय ढगाळी वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तुरीचे रोजचे परिक्षण करून शेतकऱ्यांनी किटनाशकाचा वापर करावा.- पंकज चौधरी, कृषी सहायक, अल्लीपूर.
शेंगा पोखरणाऱ्या अळीचा ‘अटॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:46 PM
यंदाच्या वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करताना ४ ते ६ तासावर सोयाबीन पिकासोबत तुरीची लागवड केली. परंतु, सध्या याच पिकावर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
ठळक मुद्देअडचणीत भर : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी