लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दादाजी धुनिवाले चौकातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. बुधवारी मध्यरात्रीच्या ही घटना घडली. गुरुवारी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.धुनिवाले चौकातील कठाणे कॉम्प्लेक्ससमोर भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या एटीएमवर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने रात्री या एटीएमसह शहरातील बहुतांश एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरच असते. हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी एटीएममधील कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्यावरील वाहतुकीमुळे चोरीचा प्रयत्न फसला आणि चोरट्यांनी पळ काढला. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.हार्डवेअरचे दुकान फोडलेवर्धा : अज्ञात चोरट्याने हार्डवेअरचे दुकान फोडून ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बोरगाव (मेघे) येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.राजेश दूबे यांचे बोरगाव परिसरात हार्डवेअरचे दुकान आहे. दुकान बंद करून ते रात्री घरी गेले असता अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास दुकानचे शटर तोडून दुकानातील ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. राजेश सकाळी दुकान उघडण्यास गेले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
धुनिवाले चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 6:00 AM
धुनिवाले चौकातील कठाणे कॉम्प्लेक्ससमोर भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या एटीएमवर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने रात्री या एटीएमसह शहरातील बहुतांश एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरच असते. हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी एटीएममधील कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून चोरीचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देचोरट्यांनी कॅमेऱ्यावर मारलेत स्प्रे : पोलिसांकडून तपासकार्य सुरू