लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गत आठवड्यापासून परिसरात नरभक्षक वाघिणीने धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत तिच्या हल्ल्यात एका शेतकºयाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. यामुळे वाघिणीचा बंदोबस्त करण्याच्या मागणीकरिता गावकºयांनी गुरुवारी वनविभागाच्या कार्यालयावर धडकले. यावेळी गावकºयांचा संताप अनावर झाल्याने त्यांच्याकडून वनविभागाचे कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.शेतकºयांचा उद्रेक पाहता पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी तहसीलदार, ठाणेदार आणि वनाधिकारी यांनी संयुक्तरित्या येथे आलेल्या गावकºयांची एक सभा घेत समज दिली. या वाघिणीच्या बंदोबस्ताकरिता एसआरपीच्या अतिरिक्त तुकड्या बोलविण्यात आल्या आहेत. सोबतच आज सकाळी हत्तीसह हैद्राबादवरुन शुटर दाखल झाले आहे. या नरभक्षक वाघिणीचा १० गावात उद्रेक सुरू असल्याने दहशत वाढली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी वनविभागाच्या कर्मचाºयांवर हल्ला होवू शकतो. यामुळे गावकरी वनविभागाला टार्गेट करीत आहे. वनविभागही या वाघिणीच्या बंदोबस्ताकरिता धावपळ करीत असून गावाकºयांनी संयम पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून होत आहे.वाघिण सापडेपर्यंत जंगल परिसरातील शेतात जावू नकातहसीलदार सीमा गजभिये, वनाधिकारी अमोल चौधरी, ठाणेदार भगवान खारतोडे यांनी गावागावात प्रत्येकी १० जणांचे दल तयार करून संरक्षण देण्याच्या सूचना करण्यात आल्या. याच वेळी रोजंदारीचे पैसे वनविभाग देणार असल्याचेही जाहीर केले आहे. वाघीण सापडेपर्यंत कुणीही जंगला शेजारील व आतील शेतात जावू नका अशी ताकीद देण्यात आली.हैद्राबाद येथील शूटर दाखलगावकºयांवर हल्ले करणाºया वाघिणीला जेरबंद करण्याकरिता वनविभागाला अपयश आले. यामुळे आता वाघिणीच्या बंदोबस्ताकरिता हैद्राबाद येथून शूटर बोलाविण्यात आले आहे. यामुळे वाघिणीच्या या प्रकरणाला वेगळे वळण येत आहे. शूटर बोलाविल्याने वाघिणीला पकडण्यात येईल अथवा तिला मारण्यात येईल, असा संशय निर्माण झाला आहे.गावांत वन कर्मचाºयांसह एसआरपीचा डेरावडाळा, येनाडा, पिलापूर, आष्टी आता धाडी, साहूर, बोरखेडी अशा मौजात वाघिणीने हल्ले सुरू केले आहे. सद्या वनविभागाचे ४८ कर्मचारी एसआरपी(वनविभाग) २८, एसआरपी(पोलीस) २३, आष्टी पोलीस ठाण्याचे ४० पोलीस, नवेगाव टायगर प्रोजेक्ट चे २२ कर्मचारी, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे ९, नागझीराचे १३ व ६ शुटर, व्हीएचएफचे ९ डॉक्टर असे सर्व जण जंगलात दिवसरात्र फिरत आहे. मात्र त्यांना वाघिण मिळाली नाही.
वनविभागाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:14 PM
गत आठवड्यापासून परिसरात नरभक्षक वाघिणीने धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत तिच्या हल्ल्यात एका शेतकºयाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.
ठळक मुद्देधाडी-साहूरवासीयांचा उद्रेक : नरभक्षक वाघिणीमुळे १० गावांत दहशत