लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोदी सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नागरिकत्व कायद्याचे विधेयक पारित करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी हे विधेयक मुस्लिमांसाठी किती घातक आहे, हे पटवून देण्याचा खोटा व केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना फूस देत आंदोलनात उतरवून देश पेटविण्याचे काम विरोधकांनी केले असून या नागरिकत्व कायद्याचा भारतात पूर्वीपासून वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांवर व धर्मावर परिणाम होणार नाही. देशाची फाळणी दुर्दैवाने धर्माच्या आधारावर झाली.पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधील अल्पसंख्य नागरिक जे अत्याचार व अपमान सहन करीत आले आहे, अश हिंदू, शीख, इसाई, बुद्ध, पारसी, जैन या धर्मातील घटकांना सरकार नागरिकत्व देत असतानाही त्याविरुद्ध रणकंदन करून मतपेटीवर डोळा ठेवण्याचे काम कॉँग्रेस व या कायद्याला विरोध करणारे सर्व पक्ष करीत असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली. संवाद या अभियानंतर्गत खासदार रामदास तडस नागरिकत्व कायद्यावर बोलत होते.भारत, पाकिस्तान व बांगलादेश या तीन देशाची निर्मिती झाली तेव्हा दोन्ही देश आपल्या कक्षेतील अल्पसंख्यकांना संरक्षण देतील, असे करारानुसार ठरले होते. त्यासंदर्भात नंतर भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यात करारही झाला होता. पण पाकिस्तानने त्या कराराचे प्रामाणिक पालन तेव्हाही केले नाही आणि आजही ते होत नाही, हे वेळोवळी सिद्ध झाले आहे. त्यामुळेच त्या देशातील अल्पसंख्यकांवर अत्याचार होत गेले. हा कायदा पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथील पीडित अल्पसंख्य हिंदू, शीख, बौद्ध, ईसाई, जैन, पारशी यांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, कुणाचेही नागरिकत्व काढून घेणे हे या कायद्यामध्ये अंतर्भूत नसून विरोधक विनाकारण भ्रम निर्माण करताना दिसत आहेत, असेही तडस म्हणाले.महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, काँग्रेस पक्षाने त्या काळात राष्ट्रीय अधिवेशनात केलेला ठराव अशा अनेक दिगजांनी पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथील पीडित अल्पसंख्य हिंदू, शीख, बौद्ध, ईसाई, जैन, पारशी यांच्याबद्दल चिंता व्यक्त करून भारतात परतण्याचे आवाहन केले होते. त्यांना सन्मानाने नागरिकत्व बहाल करण्यात यावे, अशी मागणी केली होती. आज इतिहासातील या घटनांवर साधी चर्चा होताना दिसत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बिल मंजूर करत असताना विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्यांवर चर्चा करून समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथे बहुसंख्य असलेल्या मुस्लिम समाजातील नागरिकांना भारतात नागरिकत्व का देता येणार नाही, हेदेखील केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी संसदेत स्पष्ट केले आहे.नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ व ठफउ हे दोन्ही वेगवेगळे विषय असून भारतात वास्तव्य करणाºया कुठल्याही धर्माच्या भारतीय नागरिकांवर अन्याय होणार नाही, हेदेखील केंद्र सरकारच्या वतीने वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. काही राजकीय पक्ष अवैधपणे वास्तव्य करणाºया घुसखोरांना केवळ राजकीय फायद्यासाठी मदत करून त्यांनासुद्धा नागरिकत्व देण्याची मागणी करताना दिसत आहेत, हे देखील अत्यंत चुकीचे असून याचे समर्थन करताच येणार नाही, असेही खासदार तडस यांनी स्पष्ट केले.हिंसाचाराला समर्थन नाहीच!देशातील शासकीय मालमत्ता, रेल्वे, रेल्वेस्थानक व बसगाड्यांची जाळपोळ, रेल्वेचे रुळ उखडून टाकणे, स्थानकाचे नुकसान करणे, निष्पाप नागरिकांना मारहाण करणे तसेच देशातील काही विद्यार्थ्यांना फूस देत आंदोलनात उतरवून देश पेटवण्याचे काम विरोधक करीत असून या घटनांचे समर्थन करताच येणार नाही, काही ठिकाणी पोलिस दलावर हल्ला करण्यात आला असून त्याचासुद्धा निषेध करावा तितका कमीच आहे, असे रामदास तडस म्हणाले.येणाºया काळात सर्व समाजांना व घटकांना एकत्र करून नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ बद्दल शांतिप्रिय मार्गाने समाजात जनजागृती करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस असून या कार्यात सर्वांनी सहकार्य करावे व विरोधकांनी निर्माण केलेला भ्रम दूर करावा, असे आवाहन रामदास तडस यांनी नागरिकांना केले आहे.
नागरिकत्व कायद्याविषयी भ्रम पसरवून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 6:00 AM
पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधील अल्पसंख्य नागरिक जे अत्याचार व अपमान सहन करीत आले आहे, अश हिंदू, शीख, इसाई, बुद्ध, पारसी, जैन या धर्मातील घटकांना सरकार नागरिकत्व देत असतानाही त्याविरुद्ध रणकंदन करून मतपेटीवर डोळा ठेवण्याचे काम कॉँग्रेस व या कायद्याला विरोध करणारे सर्व पक्ष करीत असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.
ठळक मुद्देरामदास तडस यांचा आरोप । संवाद अभियानाअंतर्गत मांडली भूमिका