शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सभापती निवडीकडे लक्ष

By admin | Published: January 03, 2017 12:50 AM

जिल्ह्यातील सहाही पालिकेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आता सर्वांच्या नजरा

सहा पालिकेत आज निवड : वर्धेतील सभापती निश्चित ? वर्धा : जिल्ह्यातील सहाही पालिकेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आता सर्वांच्या नजरा पाचही विषय समितीच्या सभापतींकडे लागल्या आहेत. या जागांकरिता अनेकांनी आपली फिल्डींग लावली आहे. यात कोणाची वर्णी लागेल याचा खुलासा लवकरच होणार असून सहाही पालिकेत उद्या मंगळवारी विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. वर्धा पालिकेत सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष अतुल तराळे व उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर यांच्यासह पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका विशेष सभेत निवड होणार आहे. या सभापती पदी आपली वर्णी लागावी याकरिता अनेकांनी फिल्डींग लावली आहे. वर्धा पालिकेत बांधकाम सभापती म्हणून निलेश किटे, आरोग्य सभापती म्हणून मिना भाटीया, स्वच्छता व पाणीपुरवठा सुमित्रा कोपरे, शिक्षण श्रेया देशमुख, महिला बालकल्याण सभापती म्हणून शबीना परविन खान आणि त्यांना सहकारी म्हणून आडे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा जोरात आहे. यापैकी कोणाची वर्णी लागेल हे उद्या होणाऱ्या निवडीनंतरच समोर येणार आहे. वर्धेसह जिल्ह्यातील देवळी, पुलगाव, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे) आणि आर्वी पालिकेतही निवडणूक होणार आहे. यात आर्वी येथील पक्षश्रेष्ठी वेळेवरच या सभापतींच्या नावाची घोषणा करणार आहे. देवळी जवळपास नावे पक्की झाली असून ती उद्याच जाहीर होणार आहे. तर हिंगणघाट येथेही वेळेवरच नावे जाहीर होणार असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत आहे. पुलगाव येथे सत्ता स्थापन्याकरिता भाजपा आणि अपक्षात गठबंधन झाल्याने पाच पैकी दोन पद अपक्षांना देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंदी (रेल्वे) येथे या पदांकरिता रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून आले. वर्धेत साधारणत: चित्र स्पष्ट असले तरी वेळेपर्यंत यातील नावे बदलण्याची शक्यत आहे.(प्रतिनिधी) आर्वीत स्वीकृत सदस्यपदी संजय थोरात आणि राहुल गोडबोले ४आर्वी - येथील नगर परिषदेच्या कार्यालयात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या पत्रानुसार संजय उद्धव थोरात व राहुल रमेश गोडबोले यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली जिल्हाधिकारी यांच्या स्विकृत सदस्यांना मान्यता मिळाल्याबाबत पत्राचे आज नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी वाचन करून नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे, उपाध्यक्ष पल्लवी हेमंत काळे व नगरसेवक हर्षल पांडे, प्रशांत ठाकुर, उषा सोनटक्के, सह अनेक नगरसेव व नगर सेविकांच्या उपस्थित दोन्ही नावांची घोषण केली. मुख्याधिकारी शिंदे यांनी स्विकृत सदस्य यांचे नावाची घोषणा करताच उपस्थित नगरसेवकांनी नवनिर्वाचित स्विकृत सदस्यांचे स्वागत केले. रात्रीपर्यत बैठकांचे सत्र सुरूच ४सहा पालिकेत होणाऱ्या पाच विषय समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड करावी याकरिता सहाही ठिकाणी पक्षश्रेठींच्या रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू असल्याचे दिसून आले आहे. यात कोणाचे नाव नक्की झाले याबाबत कोणीच बोलायला तयार नसल्याने अखेर शिक्कामोर्तब झालेली नावे वेळेवरच कळणार आहे. वर्धेत अभिषेक त्रिवेदी यांची निवड ४वर्धा नगर परिषदेच्या चार स्वीकृत सदस्यांपैकी तिघांची निवड झाली होती. यात अभिषेक त्रिवेदी यांचा अर्ज नामंजूर झाला होता. या अर्जावर आज निर्णय झाल्याने त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे व इतर नगरसेवकांची उपस्थिती होती. तर प्रक्रीया पार पाडण्याकरिता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.