लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात कोरोनाची भीषणता कायम असताना सेलू तालुक्यातील बोरधरणमध्ये मास्को (रशिया) येथील लेखक असलेले सर्जेव्ह सोलोव्हिव हा वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे. येथील मासे कंत्राटदाराच्या बंगल्यावर तो राहत असल्याची माहिती मिळताच यंत्रणाही खडपडून जागी झाली सर्वच सीमा बंदी असतानाही ते बोरधरणमध्ये आलेच कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.रशियन लेखक सर्जेव्ह सोलोव्हिव हा बोरधरणच्या केज फिश प्लाटंचा कंत्राट असलेल्या सचिन राणे यांच्या बंगल्यावर वास्तव्यास आहे. सचिन राणे हे मुळेचे इंदौरचे असून सध्या नागपूरात राहतो. सर्जेव्ह सोलोव्हिव हे १२ जानेवारी २०२० मध्ये भारतात आले. कोरानाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही ते नुकताच धत्तीसगड येथील जगदलपूर येथून २४ मार्चला बोरधरणला आल्याचे सांगितले जात आहे. ते बोरधरणला असल्याची माहिती मिळताच सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने, प्राथमिक आरोग्य कें द्राचे वाकडे यांनी बोरधरणला भेट उेऊन माहिती जाणून घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. कंत्राटदार राणे यांच्या कामावर असलेले आकाश सडमाके व दादू किरडे हे दोन्ही युवक हे या विदेशी पर्यटकाच्या सेवेत असतात. त्यांना कोण येते कोण जाते याची सर्व माहिती असते. यासंदर्भात या दोन्ही युवकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यासोबतच ऑटोचालक शिंगारे यांचाही यात समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता बोरधरण परिसरात बाहेरुन किती जण आलेत ते कुठे थांबलेले आहे, याची शहानिशा करणे गरजेचे झाले आहे. या विदेशी लेखकाकडे भारतात राहण्याचा २०२४ पर्यंतचा व्हिसा आहे. त्याची आरोग्य तपासणी केली असून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी दिली.
Corona Virus in Wardha; मास्को येथील लेखक वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे मुक्कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 6:16 PM
देशभरात कोरोनाची भीषणता कायम असताना सेलू तालुक्यातील बोरधरणमध्ये मास्को (रशिया) येथील लेखक असलेले सर्जेव्ह सोलोव्हिव हा वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.
ठळक मुद्देपरिसरात उडाली खळबळमत्स्य कंत्राटदाराच्या बंगल्यावर वास्तव्य