वर्धा बाजार समिती : काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद ‘आऊट आॅफ कव्हरेज’वर्धा : राजकीय अविश्वासाच्या सावटामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतीवर अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. या अविश्वासावर येत्या सोमवारी निर्णायक सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वीच बाजार समितीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. आपले सदस्य आपल्या गटात रहावे याकरिता त्यांना शोधण्यात इतर सदस्यांची दमछाक होत आहे.येथील बाजार समिती सभापतीच्या अविश्वासावरून चांगलीच गाजत आहे. दोन महिन्यांपूर्वी शरद देशमुख यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. तो पारीत झाला. यानंतर पुन्हा निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात असलेल्या युतीमुळे सभापतीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले. यात राष्ट्रवादीचे नेते सुरेश देशमुख यांनी सभापती पदाची धुरा रमेश खंडागळे यांच्या खांद्यावर देण्याचा निर्णय घेतला. मात्र याच पक्षातील श्याम कार्लेकर यांनी बंडखोरी केली. यातून झालेल्या निचडणुकीत ते विजयी झाले. याच कारणातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सदस्य समोरासमोर आले. राकाँच्या मते काँग्रेसने तर काँग्रेसच्यामते राकाँच्या सभासदांनी बंडखोराला मतदान केल्याचा वाद सुरू झाला. आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहोत हेच दाखविण्याचा साऱ्यांकडून सुरू झाला. हाच वाद मिटविण्याकरिता आता पुन्हा सभावतीवर अविश्वासाचे सावट आले आहे. सभावतींवर अविश्वासाचा ठराव जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करण्यात आला आहे. यावर येत्या सोमवारी (दि.२६) रोजी एका सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. यावेळी आयोजित सभेत आपली सत्ता राखण्याकरिता सभत्तपतींकडून सभासदांची पळवापळवी सुरू झाली आहे. सध्याच्या स्थितीत काँग्रेसचा एक व राष्ट्रवादीचा एक असे दोन सदस्य ‘आऊट आॅफ कव्हरेज’ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर आपल्या गटातील सदस्य इतरत्र जावू नये याकरिता इतर सदस्यांची धावपळ सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असला तरी कुठलाही थांगपत्ता लागत नसल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी) नगर परिषद उपाध्यक्षही अविश्वासाच्या गर्तेत, सोमवार ‘अविश्वास वार’ वर्धेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर व वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया या दोघांवर अविश्वासाची तलवार आली आहे. बाजार समितीत व पालिकेतही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्रस्तावांवर सोमवारीच शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे सोमवार वर्धेकरांकरिता अविश्वासाचा ‘वार’ ठरणार असल्याची चर्चा वर्धेत जोर धरत आहे. वर्धा पालिकेत एकाधिकारशाहीच्या विरोधात उपाध्यक्षांना हटविण्याकरिता पालिकेतील २६ सदस्य एकत्र आले. त्यांनी तसा प्रस्ताव नगराध्यक्षांना सादर केला. या प्रस्तावानुसार पालिकेत सोमवारी सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला उपस्थित राहण्याची नोटीस सर्वच नगरसेवकांना मिळाली आहे. यामुळे या सभेत होणाऱ्या निर्णयाकडे वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.
अविश्वास टाळण्याकरिता सदस्यांची पळवापळवी
By admin | Published: September 24, 2016 2:09 AM