लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : खुल्या बाजारात शेतकºयांच्या शेतमालाचे भाव कोसळल्यावर त्यांना न्याय व दिलासा देण्याकरिता राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना शेतमाल तारण योजना सुुरू करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नागपूर विभागातून तारण योजनेच्या माध्यमाने एकमेव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्कृष्ट कार्य केले. याबद्दल समितीला गुरुवारी पुणे येथे पुरस्कृत करण्यात आले.पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यात येथील बाजार समितीद्वारे सभापती अॅड. सुधीर कोठारी, संचालक मधुसूदन हरणे, सचिव टी.सी. चांभारे यांनी पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून पुरस्कार स्वीकारण्यात आला. कार्यक्रमात कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, पणन संचालक ए.बी. जोगदंड, व्यवस्थापक डी.डी. शिंदे, बाजार समितीचे राज्याध्यक्ष दिलीप मोहिते पाटील, नाबार्डचे प्रतिनिधी तथा पणन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. शिवाय राज्यात कार्यरत ३०७ बाजार समित्यांचे सभापती, संचालक, सचिव तथा कर्मचारी उपस्थित होते.तारण योजनेचे ३१३ शेतकरी लाभार्थीहरभरा, गहु व अन्य धान्य आणणाºया एकूण ३१३ शेतकºयांचा शेतमाल तारण योजनेत ठेवून सदर शेतकºयांना २ कोटी ४१ लाख ८३ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. एकूण १२ हजार ३३८ क्विंटल शेतमाल २६ आॅक्टोबर २०१६ ते १२ सप्टेंबर २०१७ या कालावधीत तारणावर ठेवून हे धनादेश देण्यात आले. या तारणाची आॅनलाईन सविस्तर माहिती पणन संस्थेला दिल्यावर ही निवड झाली आहे. तारण योजनेसाठी लातुर, अकोला, अमरावती, धामनगाव या बाजार समित्यांचीही निवड झाली. नागपूर विभागातून एकमेव हिंगणघाट कृउबासची निवड झाली.
तारण योजनेत हिंगणघाट कृषी बाजार समितीला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:36 PM
खुल्या बाजारात शेतकºयांच्या शेतमालाचे भाव कोसळल्यावर त्यांना न्याय व दिलासा देण्याकरिता .....
ठळक मुद्देनागपूर विभागातील एकमेव कृउबास : तारणावर शेतकºयांना दिले २.४१ कोटींचे कर्ज