वर्धमनेरी येथे पोलिसांचा रोडमार्च : मतदारांना सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहनसेलू : येथील तहसील कार्यालय आणि यशवंत महाविद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे मतदार जागृती कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. सतीश रघुवंशी, उद्घाटक म्हणून तहसिलदार रविंद्र होळी तर प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप काळे उपस्थित होते. मंचावर मुख्याध्यापक रंजना दाते, उपप्राचार्य प्रा. जी.डी. देशमुख, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. वसंत राठोड, प्रा. अनंत रिंंढे, डॉ. अर्चना फाळके यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना रविंद्र होळी म्हणाले, भारतीय लोकशाही व्यवस्थेत मतदान हा नागरिकांना मिळालेला एक अमुल्य अधिकार आहे. प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करणे आवश्यक आहे. त्याशिवाय लोकशाही व्यवस्था जिवंत असल्याची जाणीव प्रत्येकास होणार नाही. तर डॉ. संदीप काळे यांनी ‘मतदानाचा अधिकार: एक मानवी हक्क’ या विषयावर व्याख्यान सादर केले. जागतिक पटलावर भारत असा एकमेव देश आहे की, प्रौढ मताधिकाराचे तत्व स्वीकारुन एवढ्या विशाल लोकसंख्येतील स्त्री-पुरुषांना एकाचवेळी मतदानाचा अधिकार प्रदान केला. मानवी हक्काच्या जागतिक जाहिरनाम्यातील कलम-१९ नुसार मतदानाचा अधिकार प्रत्येकाचा एक मानवी हक्क असून लोकशाही व्यवस्थेतील व्यक्तीच्या राजकीय सहभागाचे प्रमुख तत्व आहे. प्रगल्भ लोकशाहीच्या स्थापनेसाठी प्रत्येकाने कोणत्या दबावाखाली न येता निर्भिडपणे आणि स्वत:च्या बुद्धीप्रामान्यदृष्टिने मतदान करण्याची गरज व्यक्त केली.(तालुका प्रतिनिधी)
विविध माध्यमातून मतदारांत जागृती
By admin | Published: February 03, 2017 1:57 AM