लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात वाठोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात बॅक वॉटरचे पाणी शिरत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात तक्रार करूनही संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.वाठोडा येथील साहेबराव रंगराव खोंडे, देविदास रंगराव खोंडे, संदीप दामोदर खोंडे आणि दिलीप देविदास लोकडे यांची वाठोडा शिवारात शेती आहे. या शेतींना मागील दोन वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या बँक वॉटरचा फटका बसत असल्याने शेतातील पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. संबंधितांकडे तक्रारी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मोका पाहणी केली. मात्र, प्रकल्पाचे पाणी काही राजकारणी आणि अधिकारी संगनमत करून भलत्याच सर्व्हेमध्ये दाखवित आहे.बॅक वॉटरमुळे शेती बाधित नसल्याचाही अहवाल सादर केला जात आहे. अद्यापही प्रकल्पाचे पाणी शेतात असून यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेती पाण्याखाली येत नसेल तर पाण्याबाहेरील शेती आराजीप्रमाणे मोजून द्यावी, गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या पिकांच्या नुकसानीपासून मुक्ती द्यावी, अशी मागणी खोंडे, देविदास खोंडे, संदीप खोंडे व दिलीप लोकडे यांनी केली आहे. या प्रकरणात कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा संबंधित शेतकऱ्यानी दिला आहे.ज्या शेतकऱ्यांची शेती शासनाने पूर्ण संपादित केली, त्यापेक्षा अधिक क्षेत्र बॅक वॉटरने व्यापले असल्यास ती शेती संपादित करण्यात येईल. पीक नुकसानीची भरपाई नियमानुसार देण्यात येईल. त्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. ज्यांचे अर्ज उशिराने प्राप्त झाले, त्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षणानंतर नुकसानभरपाई दिली जाईल.- नरेंद्र असाटी, पुनर्वसन उपविभागीय अभियंतानिम्न वर्धा प्रकल्प, आर्वी.
बॅक वॉटर शिरले थेट शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 5:00 AM
वाठोडा येथील साहेबराव रंगराव खोंडे, देविदास रंगराव खोंडे, संदीप दामोदर खोंडे आणि दिलीप देविदास लोकडे यांची वाठोडा शिवारात शेती आहे. या शेतींना मागील दोन वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या बँक वॉटरचा फटका बसत असल्याने शेतातील पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. संबंधितांकडे तक्रारी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मोका पाहणी केली.
ठळक मुद्देशेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान : भरपाईची देण्याची मागणी