शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

वर्धेत मोर्चातून बहुजनांचा हुंकार

By admin | Published: January 06, 2017 1:18 AM

कुण्या एका मागणीकरिता एक समाज रस्त्यावर येवून मोर्चा काढतो. यात मागणी पूर्ण होत नाही, असे म्हणत

४३ मागण्यांकरिता एकवटल्या ४४ संघटना : शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग वर्धा : कुण्या एका मागणीकरिता एक समाज रस्त्यावर येवून मोर्चा काढतो. यात मागणी पूर्ण होत नाही, असे म्हणत ‘एकच पर्व बहुजन सर्व’चा नारा देत जिल्ह्यातील सर्वच बहुजन संघटनांच्यावतीने वर्धेत गुरुवारी एका विशाल मोर्चातून आक्रोश नोंदविला. या मार्चातून तब्बल ४३ मागण्यांचे निवेदन मोर्चाच्या एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले व ते मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्याची विनंती केली. या मोर्चात विविध मागण्यांसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी, मराठा-कुणबी, एनटी, एसबीसी व अल्पसंख्याक मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, बौध्द, जैन, लिंगायत या सर्व बांधवांचा समावेश होता. मोर्चा निघण्याचे नियोजित स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान होते. यामुळे येथे सकाळी ११ वाजतापासूनच मोर्चेकरांची गर्दी उसळली होती. येथे एकत्र आलेल्या बहुजन समाजाला जिल्ह्यातील काही बहुजन नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एका मागणीकरिता एकत्र येण्याऐवजी सर्वच समाजाच्या मागण्यांकरिता एकत्र येण्याची वर्धेतील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले. हा मोर्चा कोणाच्या विरोधात नसल्याने या मैदानावर बहुजन समाज एकत्र आला होता. बहुजनांची उपस्थिती झाल्यानंतर दुपारी ३ वाजता हा मोर्चा ठरलेल्या मार्गाने रवाना झाला. अ‍ॅट्रोसिटीचा कायदा अधिक कडक करा, मुस्लीम समाजाला सच्चर कमिशन लागू करा, महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायदा कडून करून कोपर्डी आणि त्यापूर्वी व त्यानंतरच्या तत्सम घटनांमधील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच एनटी, डीएनटी, व्हिजेएनटी यांना अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे. राज्यातील १२ बलुतेदार समाजाच्या हक्काची अंमलबजावणी करून त्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तयार करावे, यासह अनेक मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा मुख्य डाकघर, शिवाजी चौकात पोहाचला. येथे मोर्चातील काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. या पुतळ्याला वेढा देत मुख्य मार्गाने बजाच चौकात पोहोचला. येथे विविध मागण्यांकरिता घोषणा देण्यात आल्या. येथून शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे रवाना झाला. रस्त्याने महापुरूषांचा जयजयकार करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ पोहोचलेला मोर्चा विसर्जित झाला. तत्पूर्वी एका शिष्टमंडळाने या मोर्चादरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.(प्रतिनिधी) महापुरूषांच्या वेशभूषेतील युवक ठरले आकर्षण ४या मोर्चात काही युवकांनी महापुरूषांच्या वेशभूषा केल्या होत्या. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा यासह गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेचा समावेश होता. या वेशभूषेतील युवक मोर्चाच्या प्रारंभी होते. चौकाचौकात त्यांच्या तोंडून घोषणा निघताच मोर्चात सहभागी युवकही घोषणा देत होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त ४वर्धा शहरातून निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणाऱ्यांची व सर्वसामान्यांची गैरसोय होवू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा ज्या मार्गे जाणार होता त्या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आली होती. मात्र मोर्चाला विलंब असल्याने त्या मार्गे होत असलेली वाहतूक कायम ठेवण्यात आली होती. मोर्चा निघताच या मार्गांवरील वाहतूक त्या काळाकरिता रोखण्यात आली होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.